बुधवारपासून (दि. 07 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. लंडनच्या के ओव्हल मैदानात सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स गमावत 327 धावांचा डोंगर उभारला होता. यादरम्यान भारताने 3 विकेट्स जरी घेतल्या असल्या, तरीही पुढे दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंवर खूपच निराश दिसला आणि त्याने लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूंनी शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेंडू पकडून थांबलेला असतो. यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) येतो. यावेळी त्याला स्पष्टपणे खेळाडूंना शिवीगाळ करताना ऐकले जाऊ शकते. यानंतर जडेजा आणि रोहित आपसांत काहीतरी बोलतात. त्यानंतर रोहित शर्मा चेतेश्वर पुजारा (Rohit Sharma Cheteshwar Pujara) याचे नाव घेऊन काहीतरी बोलताना दिसतो.
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) June 7, 2023
चौथ्या विकेटसाठी तरसताना दिसले भारतीय गोलंदाज
सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Indian Capitan Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलिया संघ जवळपास 1 तास संघर्ष करताना दिसला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने लय पकडली आणि फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. भारताला 25व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट मार्नस लॅब्यूशेन याच्या रूपात मिळाली. तो 26 धावांवर तंबूत परतला.
यानंतर पहिल्या दिवशी एकूण 85 षटके टाकण्यात आली, पण भारतीय गोलंदाज चौथी विकेट घेऊ शकले नाहीत. यावेळी ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ शानदार फलंदाजी करताना दिसले. हेडने वादळी फलंदाजी करत 156 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 146 धावा केल्या होत्या. तसेच, स्मिथनेही फलंदाजी करत 227 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 95 धावा केल्या होत्या. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी रचली होती.
मात्र, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने झटपट 4 विकेट्स गमावल्या. यामध्ये हेड (163), स्मिथ (121), कॅमरून ग्रीन (6) आणि मिचेल स्टार्क (5) यांचा समावेश आहे. हेड आणि स्मिथ यांच्यात 285 धावांची मोठी भागीदारी झाली. (wtc final day 1 ind vs aus captain rohit sharma abuse players during live match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुभमंगल सावधान! प्रसिद्ध कृष्णाही बांधला गेला लग्नबंधनात, नवदाम्पत्याचे फोटो व्हायरल
WTC FINAL: ‘सेन्सेशनल’ स्मिथचे दिवसातील तिसऱ्याच चेंडूवर शतक, भारताविरुद्ध ठोकली नववी कसोटी शंभरी