विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा पाचव्या दिवशीचा खेळ अगदी चांगलाच रंगला होता. भारतीय संघाने पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली होती. आणि नंतरच्या सत्रात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयमसनने खालच्या फळीतल्या फलंदाजांसोबत चांगली फलंदाजी केली. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली होती.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दोन्ही सलामीवीर गमावले. भारतीय संघाने पाचव्या दिवसाखेर ३२ धावांची आघाडी घेतली असून आता हे पाहणे महत्वाचे असेल की, भारतीय संघ राखीव दिवशी किती धावा उभारतो? दरम्यान न्यूझीलंड संघाचा गोलंदाज टीम साऊदीने न्यूझीलंड संघाची शेवटच्या दिवशी काय रणनिती असेल? याचे स्पष्टीकरण दिले आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर साऊदीने सांगितले की, “आम्हाला अजून ५० पेक्षा अधिक धावांची आघाडी घ्यायची होती. परंतु, भारतीय गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली आणि आम्ही दबावात आलो. तरीही आम्ही ३२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आमच्यावरचा दबाव जरा कमी झाला. संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला नेहमीच सर्वकाही जास्त हवे असते. मला पूर्णपणे विश्वास आहे कि, क्रिकेट रसिकांना शेवटच्या दिवशी चांगला खेळ बघायला मिळेल.”
साऊदीने सांगितले, “भारताची फलंदाजी खूप चांगली आहे. भारतीय संघाचे सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा सध्या खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे आम्हाला आमचा सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे लागेल. शेवटच्या दिवसाचे पहिले २ तास खूप महत्वाचे असतील. आम्ही सकाळी खेळपट्टीला बघू आणि मग खेळाचा आराखडा तयार करू. ज्या क्षणावर आता सामना उभा आहे त्यावरून असे वाटते की, या सामन्याचा निकाल लागू शकतो.”
राखीव दिवसाच्या खेळाचा सुरुवात झाली आहे. अशात साऊदीने सांगितलेली रणनिती लागू करत न्यूझीलंड संघ पहिलेवहिले कसोटी अजिंक्यपद जेतेपद जिंकू शकेल की नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहता म्हणाला, ‘प्लिज विलियम्सनला तंबूत पाठवा’; मग सोनू सूदने आपल्या उत्तरानेच केले बोल्ड
PSL 2021: पोलिसांकडून हैदराबादमधील सट्टेबाजांच्या टोळीचा भांडाफोड, ५ आरोपींना अटक
साउथम्पटनचं मैदान, २२ जूनचा दिवस अन् ४ बळी; मोहम्मद शमीचा जुळला जबरदस्त योगायोग