जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात चार बळी मिळवले. यासह शमी हा असा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे, ज्याच्या नावे आयसीसीच्या अंतिम सामन्यांमध्ये चार बळी घेण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.
शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने बीजे वॅटलिंग, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहॉम आणि कायल जेमिसन यांसारख्या फलंदाजांना बाद केले आहे. याच्या व्यतिरिक्त मोहम्मद शमीने डेवोन कॉनवेचा एक उत्कृष्ट झेल पकडून चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाचव्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर शमीने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्याशी बोलताना आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे.
त्याने सांगितले की, “दुखापतीतून बरे झाल्यानंतर इतक्या मोठ्या सामन्यामध्ये पुनरागमन करणे माझ्यासाठी एक आव्हान होते. इंग्लंडमधल्या परिस्थितीमध्ये मला गोलंदाजी करायला नेहमीच आवडते. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मला जशी गोलंदाजी करायची होती. तशी मी करू शकलो नाही. परंतु सामन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या गोलंदाजीमध्ये बदल केला.”
शमी पुढे म्हणाला की, “सकारात्मक विचार करून गोलंदाजी करणे खूप महत्त्वाचे ठरले. आम्ही एकाच जागेवर सलग चेंडू टाकण्याची रणनीती बनवली होती. आम्ही असे ठरवले होते की, जेवढ होईल तेवढं एकाच लाईनवर गोलंदाजी करायची. याचा आम्हाला खरोखर खूप फायदा झाला. माझा हाच प्रयत्न होता की चेंडू ऑन द स्टंप ठेऊ. मी फलंदाजाला फ्रंट फूटवर खेळण्यासाठी भाग पाडेन. त्याचा मला फायदा झाला.”
A 4⃣-wicket haul 👌
Southampton memories 😊
That Conway catch 👏#TeamIndia pacer @MdShami11 discusses it all with fielding coach @coach_rsridhar post the Day 5 action of the #WTC21 Final. 👍👍 – By @RajalAroraWatch the full interview 🎥 👇https://t.co/7aLQJVrpBR pic.twitter.com/zu2XSv5Zat
— BCCI (@BCCI) June 23, 2021
2019 विश्वचषकमध्ये अफगाणिस्थान संघाविरुद्ध साउथम्पटनच्या मैदानावरच शमीने हट्रिक घेण्याचा उत्कृष्ट विक्रम केला होता. पुन्हा एकदा मोहम्मद शमीने याच मैदानावर आपल्या गोलंदाजीच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण मास्टर जडेजाचा कसोटी क्रमवारीत बोलबाला, पोहोचला अव्वलस्थानी
ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा