इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर, भारतीय संघ आता 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला रवाना होईल. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात 12 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाने दोन मोठे बदल जाहीर केले. ज्यामध्ये जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला स्थान मिळाले, तर यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला मुख्य संघात स्थान देण्यात आले. जयस्वालला वगळण्याचा निर्णय सर्व चाहत्यांसाठी निश्चितच थोडा धक्कादायक होता. ज्यामध्ये त्याला प्रवासी राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता जयस्वाल स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून रणजीचा उपांत्य फेरीचा सामना खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघात बदल जाहीर केले. तेव्हा त्यांनी हे देखील स्पष्ट केले की प्रवासी राखीव संघात समाविष्ट असलेल्या तीन खेळाडूंना गरज पडल्यासच दुबईला पाठवले जाईल. अशा परिस्थितीत, यशस्वी जयस्वाल आता 2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असू शकतो. मुंबई संघाने उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणा संघाचा 152 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. आता त्यांना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नागपूरच्या मैदानावर विदर्भ संघाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे.
🚨 YASHASVI JAISWAL IN RANJI TROPHY SEMI-FINAL 🚨
– Jaiswal will be playing in the Ranji Semis for Mumbai against Vidarbha at Nagpur. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/HyPanDA5PN
— Johns. (@CricCrazyJohns) February 13, 2025
2023-25 च्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबई संघ विदर्भाशी भिडणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना गुजरात आणि केरळ संघात 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होईल. आतापर्यंत, रणजीच्या या हंगामात मुंबई संघाची कामगिरी बरीच चांगली राहिली आहे.
हेही वाचा-
आरसीबी संघाबद्दल कधीही न ऐकलेली मजेशीर आकडेवारी, पाहा एका क्लिकवर
आरसीबीचे आतापर्यंतचे सर्व कर्णधार, पाचव्या नावाचा तुम्ही कधीही विचार केला नसेल
आयपीएलमधील प्रत्येक टीमने किती कर्णधार बदलले? पाहा रोचक आकडेवारी