आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये वादळी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले आहेत. आयपीएल 2023मध्ये जयस्वाल आपल्या राजस्थान रॉयल्सला प्लेऑमध्ये जागा मिळवून देऊ शकला नाही. पण त्याचे वौयक्तिक प्रदर्शन जबरदस्त होते. याच पार्श्वभूमीवर त्याला आगामी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडले गेले आहे. जयस्वाल ऋतुराज गायकवाडच्या जागी राखीव खेळाडू म्हणून संघात सामील होणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) जून 3-4 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. पण आपल्या लग्नामुळे तो वेळेत संघासोबत जोडला जाऊ शकणार नव्हता. माहितीनुसार ऋतुराज 5 जूननंतर संघासोबत जोडला जाऊ शकत होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्यापूर्वीच संपूर्ण संघ इंग्लंडमध्ये हजर हवा आहे. असात द्रविड यांच्या सांगण्यावरून यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडले गेले आहे. हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दरम्यान, एमएस धोनी (MS Dhoni) च्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज रविवारी (28 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023च्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. या सामन्यासाठी ऋतुराज सीएसकेसाठी नेहमीप्रमाणे सलामीला येईल. असे असले तरी, आयपीएल संपल्यानंतर तो लगेच भारतीय संघासाठी उपलब्ध नसेल. आयपीएलच्या अंतिम सामन्यात सीएसकेसमोर आव्हा आहे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सचे. क्वॉलियर दोनमध्ये गुजरातने मुंबई इंडियन्सला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले.
ऋतुराज आणि जयस्वाल यांच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला, तर दोन्ही खेळाडू आपल्या-आपल्या आयपीएल संघांसाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकले आहेत. जयस्वाल यावर्षी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत होता. मात्र, राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही आणि जयस्वालचे ऑरेंज कॅफचे स्वप्नही अपूर्ण राहिले. त्याने हंगामातील 14 सामन्यांमद्ये 625 धावा केल्या आहेत. दुसरीकडे ऋतुराजने हंगामातील आतापर्यंत 15 सामन्यांमधील 14 डावांमध्ये 564 धावा केल्या आहेत. (Yashasvi Jaiswal has been given a chance to replace Rituraj Gaikwad for the WTC finals.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विमानात बायकोच्या बाजूला बसून चाहरने केले ‘असे’ काही, पाहून धोनीनेही दिली भन्नाट रिऍक्शन; Video पाहाच
‘तू काय उखडलंस…’, नवीन उल हकला ट्रोल करणे मुंबईच्या ‘या’ फलंदाजाच्या अंगलट; युजर्सनी साधला निशाणा