आयपीएल 2025 दरम्यान युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल मुंबई सोडून गोवा संघात सामील झाल्याची बरीच चर्चा आहे. यशस्वी जयस्वालने अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईऐवजी गोव्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे का केले याबद्दल विविध अटकळ बांधली जात आहेत. आता याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. (yashasvi jaiswal ajinkya rahane controversy)
यशस्वी जयस्वालचा मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी पटत नसल्याच्या बातम्या येत आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाले. (yashasvi jaiswal kicked rahane kitbag report) इंडिया टुडेमधील एका वृत्तानुसार, 2025 च्या रणजी ट्रॉफी हंगामात जेव्हा मुंबई जम्मू आणि काश्मीरविरुद्ध हरली तेव्हा यशस्वी जयस्वालने अजिंक्य रहाणेच्या किटबॅगला लाथ मारली होती. असे म्हटले जात आहे की कर्णधार आणि प्रशिक्षक जाणूनबुजून त्याला लक्ष्य करत होते आणि यशस्वी जयस्वालने रागाच्या भरात हे कृत्य केले. (yashasvi jaiswal angry on ajinkya rahane)
त्या सामन्यात यशस्वी जयस्वालने 4 आणि 26 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा पहिला डाव फक्त 120 धावांवर आणि दुसऱ्या डावात 290 धावांवर संपुष्टात आला. संघाला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. रिपोर्ट्सनुसार, अजिंक्य रहाणे आणि मुंबईचे प्रशिक्षक ओंकार साळवी यांनी यशस्वी जयस्वालच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर, मुंबईचे मुख्य निवडकर्ता संजय पाटील यांनी दिलेल्या विधानामुळे, यशस्वी जयस्वालला वाटले की त्याला लक्ष्य केले जात आहे.
पाटील यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले होते की, भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी, आम्हाला अनेक तरुण प्रतिभावान खेळाडूंना वगळावे लागले. मुंबईला अशा खेळाडूंची गरज आहे जे संघासाठी सामने जिंकून देऊ शकतील. भारतीय खेळाडूंनी हे समजून घेतले पाहिजे की केवळ सामन्यात उपलब्ध राहून काहीही साध्य होत नाही. जेव्हा तुम्ही मुंबईकडून खेळता तेव्हा तुम्हाला तुमचे 100 टक्के द्यावे लागते.