पोचेफस्टरूम| काल (9 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवत पहिल्यांदाच 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला.
या विश्वचषकात भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल चांगलाच चमकला. तो या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशस्वीने या संपूर्ण विश्वचषकात 6 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 133.33 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा (मालिकावीर) पुरस्कार देण्यात आला.
त्यामुळे एक खास योगायोगही झाला आहे. तो असा की 2003 ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे विश्वचषकात वरिष्ठ भारतीय संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते.
विशेष म्हणजे त्या विश्वचषकात भारताला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने त्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. तसेच मुंबईकडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सचिनला त्या विश्वचषकातील मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
विश्वचषकात मालिकावीर ठरला की तो खेळाडू १०० टक्के टीम इंडीयात येतोच
वाचा????https://t.co/VoHxLVlGek????#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia @yashasvi_j— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020
संपूर्ण यादी: १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचे आत्तापर्यंतचे विश्वविजेते
वाचा????https://t.co/4xhviWdXg7????#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020






