विराटच्या ‘त्या’ फोटोवर वॉशिंग्टन सुंदरने केली मजेदार कमेंट; वाचा-

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील दोन सामन्यांच्या कसोटी (2 Matches Test Series) मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्हीही संघाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संघसहकाऱ्यांबरोबरचा एक मजेदार फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या फोटोमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दिसत आहेत. या फोटोमध्ये विराट, शमी आणि शॉने डोळ्यांचे आणि चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दाखविले आहेत. तसेच या फोटोला कॅप्शन देत विराटने लिहिले की, “नवी पोस्ट सुंदर दोस्त.”

विराटच्या या फोटोवर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sunder) कमेंट केली आहे. या फोटोवर सुंदरने कमेंट करत लिहिले की, “येस भय्या.”

चेन्नईचा युवा अष्टपैलू सुंदरने 2017 मध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत 1 वनडे सामना, 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 1 विकेट तर टी20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

You might also like