भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळला जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं 32 धावांनी शानदार विजय मिळवला. आज (7 ऑगस्ट) तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. युवा खेळाडू रियान परागनं (Riyan parag) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर रिषभ पंतनं (Rishabh Pant) 616 दिवसांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टाॅस जिंकून श्रीलंकनं कर्णधार चरिथ असलंकानं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला एकदिवसीय मालिका जिंकता येणार नाही. कारण पहिला एकदिवसीय सामना टाय झाला आणि दुसरा सामना श्रीलंकेनं जिंकला. आज भारत मालिका बरोबरीत आणून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढासळलेली दिसून आली आहे. दोन्ही सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं चमकदार फलंदाजी केली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू रियान परागनं (Riyan Parag) भारतीय संघात पदार्पण केलं. त्याला भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीकडून (Virat Kohli) भारताची कॅप देण्यात आली. त्यानंतर पराग हा भावूक होताना दिसला. पण पदार्पण झाल्यानंतर परागचा एक व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये रियान पराग म्हणाला, “निवडकर्त्यांनी एक दिवस आधीच सांगितलं होतं की, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तुझं पदार्पण होणार आहे.”
A day before his Debut 🧢
The moment he was told he will play next day 👌👌
Riyan gave a heartwarming speech inside the dressing room 🤗
All heart 💙 here#TeamIndia | #SLvIND | @ParagRiyan pic.twitter.com/1i8pCiUgNb
— BCCI (@BCCI) August 7, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहितनं मारली मुसंडी, तर कोहलीचं झालं नुकसान
आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचं वनडे पदार्पण, केएल राहुलचा पत्ता कट
IND vs SL: निर्णायक सामन्यासाठी भारतानं दोन मोठ्या खेळाडूंना दिला डच्चू! संघात मोठे उलटफेर