महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात युवान नांदल, मानस धामणे, रेथिन प्रणव सेंथिल कुमार, दक्ष प्रसाद, क्रिश त्यागी, डेनिम यादव, काहीर वारिक, आर्यन शहा या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात अरुणकुमार लक्ष्मी प्रभा हिने ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित लिली फालरक्लॉचा 5-7, 6-4, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या तिस-या मानांकित युवान नंदल याने थायलंडच्या पुन्थॉन्ग कोमोपिसुत याचा 6-4, 5-7, 6-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. कोरीयाच्या चौथ्या मानांकित वूह्युकुक चांग याने जपानच्या सतोरू नाकाजिमा याचा 6-0, 3-6, 6-4 असा तर भारतच्या पाचव्या मानांकित मानस धामणेने कझाकस्तानच्या इलियास मरतुली याचा 6-3, 7-6(4) असा पराभव करत आगेकूच केली. ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकित जेरेमी झांगने भारताच्या रुशील खोसलाचा 6-4, 6-7(5), 6-4 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
जपानच्या आठव्या मानांकित रिया हत्तोरीने भारताच्या आर्यन लक्ष्मणनचा 6-3, 6-4 असा तर भारताच्या रेथिन प्रणव सेंथिल कुमारने थायलंडच्या सिवानत औत्यकुल याचा 6-3, 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. मुलींच्या गटात पहिल्या फेरीत चौथ्या मानांकित वैष्णवी आडकर हिने कझाकस्तानच्या व्लादिस्लावा अँड्रीव्स्काया चा 6-1, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार सिध्दार्थ शिरोळे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशीयनचे मानद सचिव नामदेव शिरगावकर, एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर ,डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व सहसंचालक आश्विन गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबचे वित्त विभागाचे सचिव मिहिर केळकर, पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, किशोर परांजपे, संग्राम चाफेकर, नितिन रानडे, मिलिंद लुंकड, आटीएफ व्हाईच बॅच रेफरी वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ( पहिली फेरी): मुले:
हेडन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [1] वि.वि सिद्धार्थ मराठे (भारत)6-2, 6-4
युवान नांदल (भारत) [3] वि.वि पुन्थॉन्ग कोमोपिसुत (थायलंड) 6-4, 5-7, 6-3
वूह्युकुक चांग (कोरीया) [4] वि.वि सतोरू नाकाजिमा (जपान) 6-0, 3-6, 6-4
मानस धामणे (भारत) [5] वि.वि इलियास मरतुली (कझाकस्तान) 6-3, 7-6(4)
जेरेमी झांग (ऑस्ट्रेलिया) [7] वि.वि रुशील खोसला (भारत) 6-4, 6-7(5), 6-4
रिया हत्तोरी (जपान) [8] वि.वि आर्यन लक्ष्मणन (भारत) 6-3, 6-4
रेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत)वि.वि सिवानत औत्यकुल (थायलंड) 6-3, 6-4
ताकामासा मिशिरो (जपान) वि.वि प्रज्वल तिवारी (भारत) 6-3, 6-4
बुशन हाओबाम ((भारत) वि.वि विटाली झात्सेपिन (कझाकस्तान) 6-3, 6-3
दक्ष प्रसाद (भारत) वि.वि ल्यूक कोह (सिंगापूर) 6-1, 6-2
क्रिश त्यागी (भारत) वि.वि शिंगो मसुदा (जपान) 6-3, 6-3
डेनिम यादव (भारत) वि.वि येरासिल येरडिल्डा (कझाकस्तान) 3-6, 6-1, 6-0
सुफावत साओई (थायलंड) वि.वि निशित रहाणे (भारत) 6-4, 6-7, 6-1
आर्यन शहा (भारत) [6] वि.वि रजता थमचारोन्सातित (थायलंड) 6-3, 6-1
काहिर वारिक (भारत) वि.वि मॅथ्यू जॉनस्टोन (सिंगापूर) 7-5, 7-6(5)
मुख्य ड्रॉ( पहिली फेरी): मुली:
स्यू यान टॅन (सिंगापूर) वि.वि नंदिनी दीक्षित (भारत) 6-2, 6-0
यू-युन ली (तौपेई) [1] वि.वि अस्मी अडकर (भारत) 6-1, 6-3
शिहो त्सु जिओ का (जपान) वि.वि मधुरिमा सावंत (भारत)6-0, 6-2;
अरुणकुमार लक्ष्मी प्रभा (भारत)वि.वि लिली फालरक्लॉ (ऑस्ट्रेलिया) [8]5-7, 6-4, 6-4;
वैष्णवी अडकर (भारत) [4] वि.वि व्लादिस्लावा अँड्रीव्स्काया (कझाकस्तान)6-1, 6-3;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक इन, पंत आऊट! दिग्गजाने निवडलीये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया, वाचा ओपनर कोण ते
टीम इंडियाविरूद्ध ‘बिग शो’ मॅक्सवेलची स्पेशल तयारी; पाहा व्हिडिओ
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके