दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगने, आपली खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या वाढदिवशी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. भारतीय महिला टेनिसपटूंमधील आजवरची सर्वोत्कृष्ट टेनिसपटू म्हणून ओळखली जाणारी सानिया मिर्झा आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ क्रीडाक्षेत्रातीलच नाही, तर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराजने दिल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा
सानियाच्या जवळच्या मित्रांपैकी एक असणार्या युवराजने ट्विटर पोस्टच्या माध्यमातून सानियाला एक अनोखा संदेश पाठवला आहे. आपल्या संदेशामध्ये युवराजने सानियाला ‘मिर्ची मम्मी’ म्हणत शुभेच्छा दिल्या. निवृत्तीनंतर युवराज समाजमाध्यमांवर अधिक वेळ व्यस्त असतो. तो वारंवार आपल्या माजी संघ सहकाऱ्यांची आणि मित्रांची चेष्टामस्करी करताना दिसून येतो.
‘मिर्ची मम्मी’ म्हणत केले ट्विट
युवराजने सानियाला दिलेल्या शुभेच्छा म्हटले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘मिर्ची मम्मी’.. येणारे वर्ष तुझ्यासाठी शानदार राहो. नेहमीसारखेच खूप खूप प्रेम.”
Happy birthday mirchie mommy 🌶 @MirzaSania! Hope you have an “ace” of a year ahead! Loads of love always pic.twitter.com/wPJVE1nqzs
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 15, 2020
युवराजने आपल्या ट्विटमध्ये या संदेशासह सानिया मिर्झासोबतचे एक जुने छायाचित्र देखील शेअर केले आहे.
सानिया ठरली आहे भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम महिला टेनिसपटू
आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीला २००३ साली सुरुवात करणाऱ्या सानियाला, भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम महिला टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत ६ ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया महिला एकेरीच्या अव्वल १०० खेळाडूंमध्ये पोहोचणारी एकमेव भारतीय आहे. आत्तापर्यंत ४२ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या सानियाने, भारतासाठी राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये भारताला १४ पदके मिळवून दिली आहेत. ज्यात ६ सुवर्णपदकांचा समावेश आहे. सानियाने २०१० मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाह केला आहे. त्यांना इझान नावाचा एक मुलगादेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर