क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा वाद- विवाद , भांडणे होत असतात, त्याबद्दल बरीच चर्चा पण रंगते. असाच एक वाद पहिल्या टी20 विश्वषकात भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यानच्या सामन्यात पाहायला मिळाला होता. या भांडणाचा परिणाम असा झाला की भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मोठा इतिहास घडवला.
टी20 विश्वचषक 2007, भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी देणारी ही स्पर्धा चाहते कधीच विसरू शकत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. पंरतु या स्पर्धेत युवराज सिंगने जबरदस्त कामगिरी करीत विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
या स्पर्धेत एक अशी कामगिरी त्याने केली होती, ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल. युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सामन्यात 6 चेंडूवर सलग 6 षटकार ठोकून इतिहास घडवला होता. हे सहा षटकार ठोकण्यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्टिंटॉफने युवराजला चक्क गळा कापायची धमकी दिली होती, ज्याचा खुलासा युवराज सिंगने एका पॉडकास्ट दरम्यान केला.
’22 यार्न पॉडकास्ट’ दरम्यान युवराजने सांगितले की त्याने ब्रॉडला 6 षटकार मारण्यापूर्वी अँड्र्यू फ्टिंटॉफच्या गोलंदाजीविरुद्ध 2 चौकार मारले होते त्यामुळे फ्टिंटॉफ भडकला आणि तो युवराजला बोलला की, ‘इकडे ये मी तुझा गळा कापून काढतो.’ त्या ठिकाणी खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि मग माझा सगळा राग मी पुढच्या षटकात काढला.
6, 6, 6, 6, 6, 6#OnThisDay in 2007, @YUVSTRONG12 made T20I history. pic.twitter.com/UBjyGeMjwE
— ICC (@ICC) September 19, 2017
ब्रॉडला यॉर्करचा सल्ला देत होता कॉलिंगवूड:
युवराजने इंग्लंडविरुद्ध त्या सामन्यात फक्त 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. युवराजने सांगितले की, ‘ब्रॉडच्या पहिल्या दोन चेंडूवर मी षटकार लगावले. तिसरा षटकार मी पॉइंटच्यावरून मारला, ज्या ठिकाणी मी माझ्या पूर्ण कारकिर्दीत कधी षटकार लगावला नव्हता. कॉलिंगवूड ब्रॉडला ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर गोलंदाजी करण्याचा सल्ला देत होता, कारण त्याठिकाणी सीमारेषा मोठी होती. परंतु ब्रॉड माझ्या पायांवर गोलंदाजी करीत होता. मला कळून चुकले होते की ब्रॉड प्रचंड घाबरला आहे. पाचवा चेंडु माझ्या बॅटच्या खालच्या भागात लागला परंतु छोटी सीमा असल्याकारणाने फ्टिंटॉफच्या डोक्यावरून षटकार गेला. शेवटचा चेंडूवर मी यॉर्करसाठी तयार होतो आणि ब्रॉडने माझ्या टप्यात चेंडु टाकला आणि टप्प्यात आलेल्या चेंडूवर मी षटकार मारल्यानंतर मी फ्टिंटॉफकडे हसून बघितले.’
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीचा दर्शकांनी लुटला भरपूर आनंद, ‘बियर स्नेक’चा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा