---Advertisement---

आयपीएलची रंगत वाढणार, 6 वर्षांनंतर युवराज सिंगची एन्ट्री होणार? ‘या’ दिग्गजाची जागा घेणार

Yuvraj Singh
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि क्रिकेटचे संचालक विक्रम सोलंकी फ्रँचायझी सोडू शकतात. आता मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी अष्टपैलू युवराज सिंगचा पर्याय म्हणून विचार केला जात असल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसली तरी, संघाचे मार्गदर्शक गॅरी कर्स्टन त्यांच्या पदावरून पायउतार झाल्यापासून गुजरात संघामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे.

‘स्पोर्ट्स 18’च्या मते, आयपीएल 2025 मध्ये गुजरात संघामध्ये अनेक बदल दिसू शकतात. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी गुजरात संघ सोडण्याची दाट शक्यता असून मुख्य प्रशिक्षकपदासाठी युवराज सिंगच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कोणतीही पुष्टी झाली नसली तरी गुजरात संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल शक्य आहेत. गुजरातच्या सध्याच्या कोचिंग स्टाफमध्ये आशिष कपूर, नईम अमीन, नरेंद्र नेगी आणि मिथुन मन्हास यांचाही समावेश आहे, पण रिपोर्टनुसार, हे सर्व जण नव्या संधीच्या शोधात आहेत.

गौतम अदानी गुजरात संघाची भागीदारी विकत घेणार
याशिवाय, अदानी समूह आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी गुजरात संघातील भागभांडवल खरेदी करू शकेल अशी चर्चा सुरू आहे. कदाचित यामुळेच गुजरात संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग कोणत्याही संघाशी संबंधित नसल्याने त्याला गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक बनवणे हा अतिशय आश्चर्यकारक निर्णय ठरणार आहे. 2019 मध्ये आयपीएलमध्ये युवराज शेवटचा खेळाडू म्हणून दिसला होता. याव्यतिरिक्त युवराजच्या येण्याने आणखी एक योगायोग जुळून येऊन शकतो. गुजरातचा विद्यमान कर्णधार शुभमन गिल आहे, जो युवराजप्रमाणे पंजाबमधून येतो.

गुजरात टायटन्स एकेकाळची चॅम्पियन आहे
गुजरात टायटन्स फ्रँचायझीने 2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला. आशिष नेहरा पहिल्या सत्रापासून गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि 2022 मध्ये गुजरातला आयपीएल चॅम्पियन बनवण्यातही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. हा संघ 2023 मध्ये उपविजेता ठरला होता. परंतु आयपीएल 2024 मध्ये गुजरात संघाची कामगिरी खूपच खराब होती कारण संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर होता.

महत्वाच्या बातम्या-

“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव
आयसीसीचा युएसए संघावर कारवाईचा बडगा, 12 महिन्यांसाठी टीमला केले निलंबित; कारण काय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---