बुधवारी (१७ मार्च ) शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय लीजेंड्स आणि वेस्ट इंडिज लीजेंड्स संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय लीजेंड्स संघाने बाजी मारत दिमाखात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात ४९ धावांची खेळी करणाऱ्या युवराज सिंगने सामना पाहायला आलेल्या चिमुकलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात विजय मिळवत भारतीय लीजेंड्स संघाने अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला होता. या सामन्यातील एक चिमुकलीचा व्हिडिओ युवराजला इतका भावला की त्याने आपल्या सोशल अकाउंटवर तो व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडिओमध्ये सामना पाहण्यासाठी आलेली ती चिमुकली युवराजला समर्थन देत, युवी… युवी.. असे म्हणत आहे. तसेच युवीने या चिमुकलीच्या व्हिडिओवर कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले की, “कोण आहे ही क्यूटी??अरे ओ बेटाजी काळजी घे आणि मास्क घाल.”
Who’s this cutie ?? ???? Arey ohhhh betajiii stay safe and wear your mask all times ???? pic.twitter.com/OaEpj16irl
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 21, 2021
वेस्ट इंडिज लीजेंड्स संघाविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात युवराज सिंगने २४५ च्या स्ट्राईक रेटने अवघ्या २० चेंडूत ताबडतोड ४९ धावांची खेळी केली होती. यात त्याने वेस्ट इंडीज लीजेंड्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत १ चौकार आणि ६ लांबच लांब षटकार लगावले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय लीजेंड्स संघाने २१८ धावांचा पल्ला गाठला होता. यासोबतच भारतीय संघाने १२ धावांनी विजय देखील मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा करणार लग्नाचा व्हिडिओ लॉन्च, टीझर केला प्रदर्शित
चक्क ११४ मीटरचा षटकार! एमएस धोनीने ठोकलेले ‘हे’ गगनचुंबी षटकार पाहून व्हाल अवाक्
बेन स्टोक्सला ‘या’ क्रमांकावर खेळवणे निरउपयोगी, इंग्लंडच्या दिग्गजाने सुनावले