Loading...

टीम इंडियाच्या खराब फिल्डींगमुळे युवराज सिंग नाराज; म्हणाला…

काल(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.

Loading...

मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) टीका केली आहे.

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक झेल सोडले. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनीही झेल सोडले. तर, कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) झेल सोडला होता.

Loading...

भारतीय संघाच्या खराब कामगिरीचा वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भरपूर फायदा घेतला आणि 20 षटकांत 207 धावा केल्या. मात्र, भारताने नंतर 208 धावांचे हे आव्हान 18.4 षटकांतच यशस्वीरित्या पूर्ण केले.

“आज भारतीय संघाने मैदानावर अतिशय खराब कामगिरी केली. युवा खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना उशीर केला. हा अतिरिक्त क्रिकेटचा परिणाम आहे का?,” असा खोचक प्रश्नही युवराजने ट्विट करत विचारला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोहलीच्या नाबाद 94 धावांच्या खेळीच्या मदतीने विंडीजने दिलेल्या 208 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 6 विकेट्स राखून पूर्ण केले.

Loading...

या विजयाबरोबरच भारताने त्यांचा टी20मधील सर्वाेच्च धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचाही विक्रम केला आहे.

You might also like
Loading...