मुंबई। वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना अनेक गोष्टींमुळे नेहमीच लक्षात राहिल. मोठ्या धावसंख्येचा हा सामना राजस्थानने १५ धावांनी जिंकला. पण, हा सामना सर्वाधिक चर्चेत राहिला ते सामन्यातील अखेरच्या षटकातील नो बॉलच्या वादामुळे. दरम्यान, हा वाद सुरू असताना युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यातील लुटूपुटूची भांडणं पाहायला मिळाली.
झाले असे की अखेरच्या षटकात विजयासाठी दिल्लीला ३६ धावांची गरज होती. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या रोवमेन पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले. पण तिसरा चेंडू कमरेच्या वर असल्याचे सांगत पॉवेलने मैनावरील पंच नितीन मेनन यांच्याकडे मागणी केली. मात्र, त्यांनी तो योग्य चेंडू असल्याचे सांगितले.
मात्र, या घटनेमुळे डगआऊटमध्ये बसलेला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत चांगलाच संतापला. त्याला फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण तांबे आणि गोलंदाज शार्दुल ठाकूरचीही साथ मिळाली. पंतने तर मैदानावर असलेले दिल्लीचे फलंदाज कुलदीप यादव आणि पॉवेलला परत बोलावले होते. पण नंतर त्याला शेन वॉटसनने समजावले आणि सामना पुन्हा सुरू झाला (No Ball Controversy).
दरम्यान, जेव्हा पंत फलंदाजांना परत बोलवत होता, तेव्हा कुलदीप (Kuldeep Yadav) परत जायला निघाला होता. पण त्यावेळी त्याला राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आडवताना दिसला. त्याने यावेळी गमतीने कुलदीपला टपलीही मारलेली दिसली. एकीकडे गंभीर परिस्थिती होताना दिसत होती, दुसरीकडे कुलदीप आणि चहल यांच्यात लुटूपुटूची भांडणं सुरू होती. पण त्यांच्यातील हा छोटा वाद त्यांच्यात किती चांगली मैत्री आहे, याचेही काहीप्रमाणात पुरावा देत होते.
Meanwhile Chahal & Kuldeep #pant #noball #pant ???? pic.twitter.com/A4975pt3uH
— Troyboi™ (@1ove_it786) April 22, 2022
Meanwhile Chahal and Kuldeep
????#RRvsDC #pant #Powell #umpires pic.twitter.com/MPgYsJitvU— Jignesh (@odjignesh18) April 22, 2022
दिल्लीच्या सदस्यांवर कारवाई
या वादामुळे आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) सामना शुल्काच्या १०० टक्के आणि गोलंदाज शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) सामना शुल्काच्या ५० टक्के दंड आकारण्याच आला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असून सामना शुल्काच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
राजस्थानचा विजय
या सामन्यात जोस बटलरच्या ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांत २ बाद २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने २० षटकांत ८ बाद २०७ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली- राजस्थान सामन्यातील ‘नो बॉल’मुळे चांगलाच पेटला पंत; मॅक्सवेलने मीम शेअर करत विचारला प्रश्न
IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरणे
‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा