भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचे लग्न ठरले आहे. त्याचा नुकताच साखरपूडा झाला आहे. साखरपुड्यादरम्यानचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने लग्न ठरल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली.
चहलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. ती डॉक्टर (डेंटिस्ट) आहे. तसेच ती प्रसिद्ध युट्यूबर असून तिचा युट्यूबवर चॅनेलही आहे. यावर ती तिचे डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. ती डान्स कोरियोग्राफारही आहे. युट्यूबवर तिच्या चॅनेलला १ मिलियनपेक्षाही अधिक सबस्क्रायबर आहेत.
चहलने आज(८ ऑगस्ट) सोशल मीडियावर धनश्रीबरोबर रोका झाल्याचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आम्ही आमच्या कुटुंबियांसमवेत हो म्हटलो.’
We said “Yes” along with our families❤️ #rokaceremony pic.twitter.com/Sf4t7bIgQt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 8, 2020
चहल मागील अनेक दिवसांपासून त्याच्या सोशल मीडियावरिल ऍक्टिव्हिटीमुळे चर्चेत होता. त्याने अनेकदा त्याच्या टिक-कॉकचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच तो अनेकदा इंस्टाग्राम लाईव्हवरुन अन्य खेळाडूंशी संवाद साधताना दिसला आहे. एवढेच नाही तर तो अन्य क्रिकेटपटूंच्या पोस्टवर गमतीशीर कमेंटही करत असतो, त्यामुळेही अनेकदा तो चर्चेत आला आहे.
चहलने २०१६ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने ५२ वनडे सामने खेळले असून २५.८३ च्या सरासरीने त्याने ९१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४२ टी२० सामन्यात २४.३४ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ८४ सामन्यांत १०० विकेट्स घेतले आहेत.
चहल आता १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२० मधून पुन्हा एकदा चाहत्यांना मैदानावर दिसेल. चहल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात
चालू क्रिकेट सामन्यातच खेळाडू व प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव, क्रिकेट पुन्हा धर्मसंकटात
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे केन विल्यमसन
अजब इतिहास! कर्णधाराने शुन्यावर डाव घोषीत करुनही संघाला मिळवून दिला होता विजय
जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?