fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

इंस्टाग्रामवर मुलीला मेसेज करणं चहलला पडलं महागात

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आॅन फिल्ड नाही तर आॅफ फिल्डवरील गोष्टीमुळे चर्चेत आहे. पहिल्या दोन टी२० सामन्यात संधी न मिळालेला चहल सध्या इंस्टाग्रामवरील एका मेसेजमुळे जोरदार ट्रोल होत आहे.

इंस्टाग्रामवर एका मुलीला केलेले मेसेज तिने प्रायव्हेट न ठेवता सरळ इंस्टा स्टोरी ठेवल्यामुळे चहल चांगलाच अडचणीत आला होता.

एका २० वर्षीय मुलीने तिचा एक फोटो इंस्टा स्टोरी ठेवला होता. त्याला रिप्लाय करताना चहलने मेसेजमध्ये ‘‘Nice one” असे लिहीले.

नंतर या मुलीने चहलने लिहीलेला मेसेजचा स्क्रिनशाॅट घेत जवळपास १ मिलीयन फाॅलोवर्स असलेला आणि मला माहित नसलेला क्रिकेटर मला मेसेज का करतोय अशी इंस्टा स्टोरी ठेवली.

यामुळे चांगलाच गडबडलेल्या चहलने चटकन मेसेज करत माफी मागितली. तसेच हा मेसेज मी नाही तर माझ्या मित्राने पाठवला असा रिप्लाय केला. तसेच पुन्हा माफी मागितली.

यावर त्या मुलीने आॅल राईट असे म्हटले परंतु चहलने केलेले मेसेज पुन्हा इंस्टा स्टोरी ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिलीच ओव्हर मेडन खेळल्यानंतर रोहितने केले असे काही, ज्याचा कुणी विचारही केला नसेल

३९९८ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत न जमलेली गोष्ट रोहित शर्मा केवळ १ वर्षात करुन दाखवली

बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा

धोनी, विराट नव्हे तर कर्णधार रोहित शर्माने केला आहे हा मोठा पराक्रम

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

 

You might also like