---Advertisement---

चहलचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह; गोलंदाज भावुक होत म्हणाला, ‘आपल्या लोकांना जवळ ठेवाव’

On: रविवार, मे 16, 2021 7:40 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याचे कुटुंब सध्या कठीण अवस्थेतून जात आहे. चहलच्या पालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चहलने नुकताच सोशल मीडियात आपल्या कुटुंबाचा फोटो शेयर केला आहे. या फोटोत चहलचे सर्व कुटुंबीय फारच आनंदी दिसत आहे. हा फोटो शेअर करत चहलने लिहिले, ‘आपल्या लोकांना नेहमीच जवळ ठेवावे.’ या वाक्याच्या पुढे चहलने एक हार्टची ईमोजी देखील शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CO44IIgsTiR/?igshid=b21khshmhsvn

 

चहलचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी सर्वप्रथम त्याची पत्नी धनश्रीने सर्वांना सांगितली होती. धनश्रीने इंस्टाग्रामद्वारे ही माहिती दिली होती. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते की, ‘एप्रिल आणि मे महिना आमच्यासाठी खूपच कठीण होता. हे एक भावनिक आव्हानासारखे आहे. प्रथम माझा भाऊ आणि आई कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यावेळी मी आयपीएलच्या बबलमध्ये होते. मी स्वत:ला असहाय्य जाणवत होते. पण वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारना करत होते. कुटुंबापासून दूर राहणे खरोखर कठीण आहे .ते या आजारातून बरे झाले, पण माझ्या एक काकू आणि जवळच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.’

धनश्रीने पुढे लिहिले होते की, ‘आता माझी सासू आणि सासरे गंभीर लक्षणांसह कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सासऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आईवर घरी उपचार सुरू आहेत. मी दवाखान्यात होते आणि सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. तुम्ही सर्व घरीच रहा. जर तुम्ही अशा कोणत्याही रुग्णाला ओळखत असाल तर त्याला नक्की मदत करा.’

ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर अनेकांनी चहलच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत.

Photo Courtesy: Instagram/@dhanashree9
Photo Courtesy: Instagram/@dhanashree9

तसे तर, भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांना कोरोना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या पालकांना कोरोना झाला होता. तसेच दुःखद बाब म्हणजे आरपी सिंग व पियूष चावला या दोन खेळाडूंच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झालेले आहे. भारतात सध्या कोरोनाचा तीव्र उद्रेक सुरू असून खेळाडूंना बायोबबलमध्ये देखील कोरोना होत असल्यामुळे आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“तुम्हाला तुलना करायची असेल तर, मी बहुतेक खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी केली”, भारतीय खेळाडूने दिली प्रतिक्रिया

लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार

“दुखापतीमुळे कारकिर्द संपणे खूपच निराशाजनक”, तब्बल ६१४ विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटपटूची अवघ्या ३४ व्या वर्षी निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---