भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत करत या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला काही वेळ विश्रांती करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते मजा-मस्ती करताना दिसून आले होते. अशातच रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल हे देखील मस्ती करताना दिसून आले होते. दरम्यान त्यांच्या एका फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे दोघांच्याही पत्नींनी देखील मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित आणि चहल हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात. ते काही ना काही शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. अशातच चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा चहलला फूल देताना दिसून येत आहे. चहलने या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे. त्याने कॅपशनमध्ये “सेनोरिटा ” असे लिहत पुढे ईमोजी देखील टाकल्या आहेत. या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
या मजेशीर फोटोवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने देखील ईमोजी शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “दोघांनाही या फोटोमध्ये पोज देण्यासाठी सांगावे लागले नाही. फोटो क्लिक करणाऱ्याचे आभार.”
रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. तसेच चहल बीसीसीआय टीव्हीमध्ये खेळाडूंची मजेशीर मुलाखत घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान
दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूचे नाव नेतृत्वासाठी आघाडीवर
रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर