विराट कोहलीला कोणीही दिल्या नसतील अशा हटके शुभेच्छा दिल्या युजवेंद्र चहलने

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना पुण्यामध्ये सुरू आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 50 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो 50 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटीत नेतृत्व करणारा एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केेले होते.

त्यामुळे विराटला भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने खास हटके शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. चहलने विराटचा एक फोटो पोस्ट करत मजेशीर ट्विट केले आहे की ‘अभिनंदंन भैय्या, माझ्या तुलनेत फक्त 50 कसोटी सामने जास्त आहेत.’

विशेष म्हणजे चहलने आत्तापर्यंत एकही कसोटी क्रिकेट सामना खेळलेला नाही, पण विराटने 50 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

चहल आत्तापर्यंत फक्त वनडे आणि टी20 क्रिकेट खेळला आहे. यादरम्यान त्याने 50 वनडे सामन्यांमध्ये 85 विकेट्स आणि 31 टी20 सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतले आहेत.

You might also like