खेळाडूंना होत असलेल्या कोरोनामुळे आयपीएल 2021 स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडूंनी आता बायो-बबल सोडण्यास सुरुवात केली आहे. बायो-बबलमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर कोणालाही वेगळे होणे खूप कठीण आहे. विशेषतः कोरोना काळात सर्व लोक भावनिकरित्या आणखीनच जवळ आले होते. असाच काहीसा प्रकार आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोबत घडत आहे.
धनश्रीने बायो-बबल सोडताना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भावनिक कॅप्शन लिहिले आहे. धनश्रीने इंस्टाग्रामवर पती युजवेंद्र चहल, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलस सोबतचा फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करताना धनश्रीने या सर्वांच्या ग्रुपला ‘5 एएम क्लब’ असे नाव देत आपण या सर्वांना फार मिस करू, असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/COfOCiflaSA/
दरम्यान आयपीएल 2021 चा विचार केला असता अखेर त्यात करोनाचे विघ्न पडले आहे. कोरोनामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आयपीएलच्या आयोजनासंदर्भात कोरोनाची भीती वर्तवली जात होती. तरीदेखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याची योजना आखली मात्र त्यात त्यांना अपयश आले आहे.
बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याची चर्चा होती व अखेर बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळात सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आला सोनू सूद; केली ‘ही’ मोठी मदत
शिखर धवनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत म्हणाला…
पुन्हा भेटू, काळजी घ्या! भारताचा निरोप घेताना हळहळली दिग्गजांची मनं; एकाने तर मागितली माफी