चेन्नईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावाचा शेवट झाला तो दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा, अर्जुन तेंडूलकरवर बोली लागल्यानंतर.अर्जुनला आयपीएल इतिहासात ५ वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने २० लाखाच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामाविष्ट करून घेतले आहे.
अर्जुनवर बोली लावणाऱ्या, पूर्व भारतीय गोलंदाज जहिर खान याने म्हटले आहे की, “अर्जुन तेंडुलकर खूपच मेहनती मुलगा आहे. त्याला खूप काही शिकायची ईच्छा आहे. ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु सचिनचा मुलगा असल्याचा दबाव आयुष्यभर त्याच्यावर राहणार आहे. या गोष्टीसोबत त्याला आयुष्यभर जगावं लागणार आहे.”
अर्जुन यापूर्वी देखील मुंबई इंडियन्स संघासोबत होता. तो गेल्या काही सत्रापासून मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलरची भूमिका बजावत होता. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली होती. तेव्हा देखील अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर म्हणून उपस्थित होता. परंतु यावेळी त्याची जबाबदारी वाढली आहे. तो यावेळेस मुंबई इंडियन्स संघासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार आहे. अर्थातच तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अपयश
अर्जुन तेंडूलकर याची नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच पोलिस शिल्ड स्पर्धेत त्याने फलंदाजी करताना एकाच षटकात ५ षटकार लगावले होते. यासोबतच ३ गडी बाद करण्यात त्याला यश आले होते. अर्जुन मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना कशी कामगिरी करतो? यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तमिळनाडूला मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणारा ‘तो’ गाजवणार आयपीएलचं मैदान, आरसीबीत झाला सामील
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ‘या’ खेळाडूंची झाली चांदी, फ्रँचायझींनी ओतला पाण्यासारखा पैसा
पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार? वाचा कारण