बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीत पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेमधील पहिला सामनाही गमवावा लागला. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने शतक झळकवले ११४ चेंडूत १० चौकरांच्या मदतीने १०२ धावा केल्या. या शतकच्या मदतीने बांगलादेश संघाला ५० षटकामध्ये ९ विकेट गमावून २७६ धावा करता आल्या. फलंदाजी करताना झिमाब्बेचा संघ फक्त १२१ धावा करू शकला. पण,या सामन्यादरम्यान चर्चा झाली ती झिम्बाब्वेचा गोलंदाज रिचर्ड नगारवाच्या सेलिब्रेशनची.
या सामन्यात बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीला उतरला असताना नगारवाने बांगलादेशचा फलंदाज मोसदेक हुसेनची विकेट घेतली, तेव्हा पायातील बूट काढून फोन लावण्याची ऍक्शन केली. त्याच्या या कृतीचा व्हि़डिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच त्याच्या या कृतीची बरीच चर्चा देखील आहे. या सामन्यात नगारवाने १० षटकात २ बळी घेऊन ६१ धावा दिल्या. त्याने शतक झळकवणाऱ्या लिटन दासची देखील विकेट घेतली.
यापूर्वी नगारवासारखे सेलिब्रेशन दक्षिण आफ्रिकेच्या ताब्राईज शम्सीलाही करताना पाहाण्यात आले आहे. त्यानेही अनेकदा पायातील बूट काढून फोटो लावण्याची ऍक्शन करत सेलिब्रेशन केले आहे.
https://www.instagram.com/p/CRYtLZeF7FW/
टेलरचा २०० वा सामना
या सामन्यात विजय मिळवून बांगलादेश १-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशच्या विजयात अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने देखील मोलाचा वाटा उचलला. त्याने गोलंदाजी करत असताना ३० धावा देऊन ५ बळी मिळवले.
याबरोबरच हा सामना झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलरचा हा २०० वा सामना होता. परंतु, या सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रसेलचा गोलंदाजीत राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
पुन्हा खेळणार का कसोटी क्रिकेट? भुवनेश्वर कुमारने दिले ‘हे’ उत्तर
श्रीलंका वि. भारत: दोन्ही संघांना खुणावतायेत नवे विक्रम; शिखर करू शकतो ‘हा’ पराक्रम