Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी जिम्बाब्वे करणारा ऑस्ट्रेलिया दौरा, क्वालिफायर सामन्यात नेदरलँड पराभूत

टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी जिम्बाब्वे करणारा ऑस्ट्रेलिया दौरा, क्वालिफायर सामन्यात नेदरलँड पराभूत

July 18, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Zimbabwe-vs-Netherlands

Photo Courtesy: Twitter/ZimCricketv


रविवारी (१७ जुलै) जिम्बाब्वे आणि नेदरलॅंड यांच्यातील टी-२० सामना खेळला गेला. जिम्बाब्वेने हा सामना जिंकून आगामी टी-२० विश्वचषकात स्वतःचे स्थान पक्के केले आहे. क्रेग इरविनच्या नेतृत्वातील जिम्बाब्वे संघाने हा सामना ३७ धावांनी जिंकला. या विजयानंतर त्यांनी आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या ग्रुप-बी मध्ये शेवटचे स्थान गाठले आहे. 

आगामी काळातील आयसीसी टी-२० विश्वचषक (T20 World Cup-2022) ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकाच्या ग्रुप-बी मध्ये आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यासह आणि आता जिम्बाब्वे (Zimbabwe) संघही खेळताना दिसणार आहे. जिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड (Zimbabwe vs Netherlands) यांच्यातील रविवारी खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली.

Zimbabwe crowned ICC Men’s T20 World Cup Qualifier B champions

Match report 👇https://t.co/Hdn98uUZV8 pic.twitter.com/wWuayW9QDX

— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 18, 2022

कर्णधार क्रेग इरविन (Craig Ervine) याने नाणेफेक जिंकल्यानंतर जिम्बाब्वेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेला जिम्बाब्वे संघ समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. १९.३ षटकांमध्ये १३२ धावा करून त्यांचा संघ सर्वबाद झाला. नेदरलँडसाठी हे लक्ष्य सोपे वाटत होते, पण त्यांना ते गाठता आले नाही. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेले नेदरलँडचे फलंदाज १८.२ षटकांमध्ये ९५ धावा करून सर्वबाद झाले. सिकंदर रजा याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे त्यांच्या खेळाडूंनी झटपट विकेट्स गमावल्या. सिकंदरने टाकलेल्या ४ षटकांमध्ये अवघ्या ८ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने एक निर्धाव षटकही टाकले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर निवडले गेले आहे.

तत्पूर्वी जिम्बाबेसाठी सीन विलियम्सने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याने २५ चेंडू खेळले असून ३ चौकारही ठोकले. त्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक रेगिस चकाबवानेही १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. नेदरलँडच्या लोगन वॅन बीकने १८ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात यावर्षी खेळला जाणारा टी-२० विश्चचषक १६ ऑस्टोबरपासून सुरू होईल आणि १३ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. ग्रुप-बी मध्ये सहभागी असलेल्या जिम्बाबे संघाला विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. याच दिवशी वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंड संघही एकमेकांशी भिडतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्म्रीती मंधना

‘तो भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू’, वाचा रोहितने सामना जिंकल्यानंतर का गायले चहलचे गोडवे?

VIDEO। कोहलीचं शतक नाही, पण त्याची डान्स स्टेप पाहून म्हणाल ‘वाह क्या बात है!’


Next Post
Rishabh Pant & Hardik Pandya

रिषभ पंत अन् इंग्लंडचा अंत! वनडेतील पहिलेच शतक झळकावत परदेशी भुमीवर केलीये 'ही' रेकॉर्डब्रेक कामगिरी

Virat-Kohli

जोकोविचलाही वाटतयं विराटने लवकर फॉर्ममध्ये यावे! कृतीतून दर्शवला पाठिंबा

Rishabh-Pant-5-fours-in-a-row

हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143