पुणे, 3 नोव्हेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन वैभव फायनेस टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 व 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा वैभव फायनेस टेनिस अकादमी, लॉ कॉलेज रोड या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक वैभव अवघडे यांनी सांगितले. (120 players participate in PMDTA Ranking Vaibhav Fiennes Tennis Academy Bronze Series 2023)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर 22 यार्डस संघ विजयी
ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीजमध्ये देशतून 200हून अधिक खेळाडू सहभागी