भारताच्या ऑस्ट्रेलिया बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ अनवाणी पायाने मैदानात उतरले आणि त्यांनी काही काळ गोलाकार उभे राहात मौन पाळले.
याबाबत cricket.com.auने माहिती दिली आहे की दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीला समर्थन म्हणून आणि ऑस्ट्रेलियाच्या स्वदेशी लोकांच्या सन्मानार्थ अनवाणी पायाने मैदानात उतरले होते. याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. याबरोबरच आयसीसीनेही या घटनेचे फोटो शेअर केले आहेत.
Australia and India take part in a Barefoot Circle to respectfully acknowledge our First Nations people, the traditional owners of the land, and pay their respects to the country #AUSvIND pic.twitter.com/SVmgU6JeDD
— cricket.com.au (@cricketcomau) November 27, 2020
Players from both teams paid tribute to Australia's indigenous people in a Barefoot Circle ceremony before the start of play 🙌#AUSvIND pic.twitter.com/jgYIF81Bxs
— ICC (@ICC) November 27, 2020
पॅट कमिन्सने केला होता खुलासा
पहिल्या सामन्यात अनवाणी पायाने मैदानात उरतण्याबाबत काहीदिवसांपूर्वी ईसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने सांगितले होते, “वर्णद्वेषाविरोधात आणि ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीला समर्थन म्हणून, आम्ही प्रत्येक मालिकेच्या पहिल्या सामन्यावेळी मैदानावर अनवाणी गोलाकार उभे राहू. वर्णद्वेषाविरोधात हे एक छोटे पाऊल आहे. मात्र, आम्ही नवी सुरुवात करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.”
ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक –
पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या वनेडत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, शिखरबरोबर ‘हा’ खेळाडू येणार सलामीला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विराटच्या निशाण्यावर सचिन आणि पॉन्टिंगचे मोठे विक्रम
…..म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या वनडेत काळी पट्टी बांधून उतरतील मैदानात
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
क्रिकेटमध्ये ६ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना ज्यामुळे हेलावले होते क्रिकेट जगत
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर