ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या डावात 115.2 षटकांत सर्वबाद 369 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने विशाल धावसंख्या उभारल्यानंतर दमदार गोलंदाजी करताना दुसर्या दिवसअखेर भारतीय संघाला 62 धावांवर दोन गडी बाद करून मोठे धक्के दिले आहेत. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड होताना दिसत आहे. त्याचबरोबर असे होण्यासाठी भारतीय संघाचे प्रदर्शन कारणीभूत आहे. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलिया संघाने उचलला. त्यामुळे आज आपण या लेखामधून भारतीय संघाने कोणत्या दोन मोठ्या चूका केल्या आहेत. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला याचा फायदा झाला आणि 307 धावांची आघाडी घेतली, ते जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी केलेल्या दोन चुका:
1. चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा बेजबाबदार फटका खेळून बाद
रोहित शर्माने नेहमी प्रमाणे ब्रिस्बेन येथे होत असलेल्याला कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने या डावात फलंदाजी करताना उसळी घेत असलेल्या खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा उचलताना काही आकर्षक फटके सुद्धा खेळले होत. त्याचबरोबर रोहित शर्मा धावपट्टीवर व्यवस्थित स्थिरावला होता. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.
रोहित शर्माने आपल्या खेळीत 74 चेंडूचा सामना करताना 6 चौकार ठोकत 44 धावांची खेळी केली साकारली होती. त्यानंतर 20 व्या षटकात फिरकीपटू नॅथन लायनच्या गोलंदाजीवर आक्रमकपणे मोठा फटका खेळण्याच्या नादात चुकीचा फटका मारून रोहित शर्मा बाद झाला. त्याने खेळल्या हा फटका बघून वाटत होते की, रोहितने स्वतःहून आपली विकेट फेकली. त्याला या क्षणी असा बेजबाबदार फटका मारण्याची काही गरज नव्हती.
अशा प्रकारे भारतीय संघाने आपल्या अनुभवी खेळाडूला गमावले. त्यामुळे त्याच्यावर खूप टीका करण्यात आली. कारण तो बाद होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ दबावात होता आणि त्याचबरोबर धावा सुद्धा येणे सुरू होते.
2. ऑस्ट्रेलिया संघातील तळाच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या
भारतीय संघाच्या दृष्टीने खूप वर्षापासून एक चूक होत आहे. म्हणजे एकप्रकारे ती भारतीय संघाची कमजोरी राहिले आहे. भारतीय संघ गोलंदाजी पहिल्यांदा दमदार कामगिरी सुरुवातीच्या फलंदाजांना पटकन बाद करताना यशस्वी ठरतो. मात्र तळातील फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरतो. ज्यामुळे विरुद्ध संघ या ठिकाणी धावा काढून जातो.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या 8 विकेट्स फक्त 315 धावसंख्येवर घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर राहिलेल्या दोन विकेट्ससाठी ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय गोलंदाजांना खूप संघर्ष करायला लावला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने धावा सुद्धा काढल्या. ज्याठिकाणी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया 330 धावसंख्येवर रोखायला हवे. त्याठिकाणी भारतीय संघाने 2 विकेट्स घेण्यासाठी खूप वेळ लावला त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 369 धावांचा डोंगर उभा केला.