कोलकाता। आयपीएल २०१८ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये इडन गार्डन, कोलकाता येथे सामना सुरू आहे. या सामन्यात कोलकाताचा नवीन कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाताकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या ब्रेंडन मॅक्क्यूलमने आज ट्वेंटी20मध्ये एक खास विक्रम केला. टी20 सामन्यात त्याने 9000 धावांचा टप्पा पार केला.
काय आहे हा खास योगायोग-
या सामन्यात मॅक्क्यूलमने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध 27 चेंडूत 43 धावांची खेळी केली. बरोबर 11 वर्षांपुर्वी 18 एप्रिल 2008 रोजी या खेळाडूने आयपीएल इतिहासातील दुसरा चेंडू खेळला होता आणि तेव्हा त्याचा संघ होता कोलकाता नाईट रायडर्स तर विरुद्दध बाजूला संघ होता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. त्या सामन्यात मॅक्क्यूलमने73 चेंडूत 158 धावांची खेळी केली होती.
आज काय केला विक्रम-
ट्वेंटी20सामन्यात 9000 धावा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी ख्रीस गेलने 323 सामन्यात 11068 धावा केल्या आहेत.
तर ब्रेंडन मॅक्क्यूलमने 330 सामन्यात 31च्या सरासरीने 9013 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या 7 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे.