बाॅल टेंपरींग प्रकरणी शिक्षा झालेला आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने सीडनी येथील नाँक्स ग्रामर स्कूलला एका कार्यक्रमानिमित्त नुकतीच भेट दिली.
यावेळी स्मिथने तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याने विद्यार्थांशी बोलताना केपटाऊन कसोटी सामन्यावेळीच्या बाॅल टेंपरींग प्रकरणात हात घातला.
तो म्हणाला की, “या प्रकरणामुळे माझी मानसिक स्थिती अत्यंत खराब होती. मी यामुळे सतत चार दिवस रडत होतो.”
“बाॅल टेंपरींग प्रकरण माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट घटना होती”.
स्मिथ आणि वार्नर 28 जूलै पासूण सुरू होणाऱ्या कॅनेडियन टी-20 लिगमधे सहभागी होणार आहेत.
बाॅल टेंपरींग प्रकरणामुळे स्मिथ, वार्नर आणि बेनक्राॅफ्टवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्थानिक तसेच आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे.
मात्र त्यांना लीग स्पर्धांमधे सहभागी होणास कोणतीही बंदी नाही.