येत्या 14 जून पासून फुटबाॅलचा रणसंग्राम म्हणजेच एकविसाव्या फीफा विश्वचषकाला सुरवात होत आहे.
रशियामधे होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत एकून 32 संघ सहभागी होणार आहेत.
भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता आले नाही. तरीही मोठ्या प्रमाणात भारतातही या फिफा विश्वचषकाविषयी ऊत्साह आहे.
गेल्या सलग तेरा विश्वषकांपासून फिफासाठी फुटबाॅल डिझाईन करत असलेल्या अदिदास या क्रीडा साहित्य ऊत्पादक कंपनीने यावेळच्या विश्वचषकालाठी एक विशिष्ठ प्रकारचा फुटबाॅल डिझाईन केला आहे.
आदिदास कंपनीने डिझाईन केलेल्या फुटबाॅलचे ‘टेलस्टार-18’ असे नाव ठेवण्यात आले आहे. या फुटबाॅलमधे एक चिप बसवण्यात आली आहे. या चिपच्या माध्यमातून स्मार्ट फोन या फुटबाॅलला कनेक्ट करून विश्वचषकातील सामन्यांची आकडेवारी प्रेक्षक मिळवू शकणार आहेत.
या ‘टेलस्टार-18’ फुटबाॅलचे ऊत्पादन पाकिस्तानमधील सियालकोटमधे झालेले आहे. 1994 पासून आदिदासशी टाय-अप असलेल्या फाॅरवर्ड स्पोर्ट्स कंपीनीत हा फुटबाॅल तयार केला आहे. 2014 मधे ब्राझील येथे झालेल्या विश्वचषकासाठीही सियालकोट येथे ऊत्पादित केलेला बाॅल वापरण्यात आला होता.
तसेच या फुटबाॅलला 32 वाॅल पॅनल ऐवजी पांढऱ्या काळ्या रंगाचे 6 वाॅल पॅनल असतील. 1994 मधे अमेरिकेत झालेल्या विश्वचषकानंतर प्रथमच बाॅल पांढऱ्या काळ्या रंगात असेल.