तीन जूलैपासून भारताचा तीन टी-20, तीन एकदिवसीय व पाच कसोटी मालिकेचा इंग्लंड दौरा सुरू होतोय. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने भारतासाठी हा दौरा महत्वाचा आहे. तसेच काही अपवाद वगळता भारतीय संघाची कसोटीत इंग्लडमधे कामगिरी कायमच खराब राहीली आहे. यावेळी भारत ती सुधारन्याचा प्रयत्न करेल.
यावेळीही भारतीय संघाची भिस्त विराट कोहली, अजिंक्य राहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेवर साऱ्या क्रिकेट जगताच्या नजरा एका खास कारणामुळे लागून आहेत. ते म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कसोटी स्पेशलिस्ट गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यामधील लढत.
जेम्स अॅंडरसन हा इंग्लंडचा सर्वात महान गोलंदाज आहे. या खेळाडूने इंग्लंडकडून खेळताना १३८ सामन्यात ५४० विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ५व्या स्थानी आहे.
विराट कोहलीचा हा इंग्लंडचा दुसराच कसोटी दौरा आहे. गेल्यावेळी भारताने 2014 साली इंग्लंडमधे कसोटी मालिका खेळली होती. त्यामधे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 3-1 आशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
2014 च्या दौऱ्यात कोहलीची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. त्याला जेम्स अँडरलनच्या स्विंग गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले होते. त्याने पाच सामन्यात 13.40 सरासरीने फक्त 134 धावा करता आल्या होत्या. त्याला अँडरसनने चार वेळा बाद केले होते.
विराटची आजपर्यंतची कसोटीत जगभरात कामगिरी चांगली झाली आहे. पण आता त्याला स्व:ताला एक चांगला कसोटी फलंजदाज म्हणून सिध्द करायचे असेल तर त्याची इंग्लंडमधे कामगिरी सर्वोच्च असावी लागेल.
2014 विराट इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा तो नवखा होता. आता मात्र गोष्ट वेगळी आहे. गेल्या चार वर्षात फलंदाज म्हणूण कोहलीने स्व:तामधे खूप सुधारणा घडवून आणली आहे.
तसेच त्याच्यावर यावेळी फलंदाजी बरोबर कर्णधारपदाची जबदारीही आहे.
या दौऱ्यापूर्वी इंग्लंडमधे खेळण्याचा सराव व्हावा आणि तेथील वातावरणाशी जूळवून घेता यावे म्हणूण कोहली इंग्लंडमधे कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघातून खेळणार होता. पण त्या मणक्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.