---Advertisement---

वयाच्या २९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने क्रिकेटला केले ब‍ायबाय; वडिलांच्या नावावर होते तब्बल ९३१ विकेट

---Advertisement---

मुंबई । क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात वडिलांनी जागतिक क्रिकेटवर राज्य केले आहे आणि त्यांचा मुलगा 22 यार्डच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडर्मोटच्या बाबतीतही हेच दिसून आले. मॅकडर्मोट हे एक वेगवान गोलंदाज होते, त्यांनी संपूर्ण देशांतर्गत कारकिर्दीत 931 बळी घेतले, परंतु त्यांचा मुलगा ऍलिस्टर मॅकडर्मोट अवघ्या 29 व्या वर्षी निवृत्त झाला आहे.

ऍलिस्टर हा त्याच्या वडिलांसारखा वेगवान गोलंदाज होता आणि त्याने 20 प्रथम श्रेणी सामन्यांत 75 विकेट्स घेतल्या तसेच अ दर्जाच्या सामन्यांत 48 आणि ट्वेंटी20 सामन्यांत 29 विकेट्स घेतल्या आहेत.

दुखापतीमुळे ऍलिस्टर मॅकडर्मोटने तरुण वयात क्रिकेटचा निरोप घेतला. अ‍ॅलिस्टरने संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींचा सामना केला. यामुळेच त्याने शुक्रवारी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने वयाच्या 18 व्या वर्षी पदार्पण केले होते. 2009 मध्ये पदार्पणानंतर तो 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ होता. एवढेच नव्हे तर त्याने आपला संघ क्वीन्सलँड सोबत शेफील्ड शिल्ड चषक आणि वनडे विजेतेपदही जिंकले.

बिग बॅशच्या दुसऱ्या हंगामात तो चॅम्पियन्स बनणारा ब्रिस्बेन हीटचाही तो सदस्य होता. परंतु ऍलिस्टरला 22 वर्षांचा असताना दुखापतीने घेरले. दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला धक्का बसला. तो शारीरिक आणि मानसिक दबावातून जात होता. ऍलिस्टरने सततच्या दुखापतींमुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्याने शुक्रवारी (३१ जुलै) याची घोषणा केली.

सेवानिवृत्तीनंतरही ऍलिस्टर मॅकडर्मोट क्रिकेटशी संबंध कायम ठेवणार आहे. निवृत्तीनंतर त्याने आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवायचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच तो क्रिकेट कोचिंगवरही लक्ष देणार आहे.

ऍलिस्टरचा धाकटा भाऊ बेन मॅकडर्मोटने ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवले आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून 12 टी20 सामने खेळले आहेत. ऍलिस्टरचे वडील क्रेग मॅकडर्मोट ऑस्ट्रेलियामधील एक दिग्गज गोलंदाज होते. त्यांनी 71 कसोटी सामन्यांमध्ये 291 विकेट्स घेतल्या, तर 138 वनडे सामन्यात 203 बळी घेतले. क्रेग यांनी 174 प्रथम श्रेणी सामन्यांत 677 बळी घेतले आणि यादी अ क्रिकेटमध्ये 254 बळीही घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘हा’ माजी खेळाडू आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्यास इच्छुक; बीसीसीआयकडे केली विनंती

-विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’

-कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी

-पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी

ट्रेंडिंग लेख-

-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

-क्रिकेटच जीव की प्राण: कुटुंबातील सुख-दु:खाच्या क्षणांना बाजूला ठेवत क्रिकेटला प्राधान्य देणारे १० खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---