इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये गणल्या जाणाऱ्या एमएस धोनीने एक मोठा पराक्रम केला आहे. धोनीने त्याचा आयपीएल कारकिर्दीतील यष्टीमागील १००वा झेल पकडला आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे किंग्स इलेव्हन पंदाबविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा कारनामा केला आहे.
नाणेफेक जिंकत पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात १७८ धावांचा स्कोर उभारला. दरम्यान सलामीला फलंदाजीसाठी आलेला पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रशंसनीय फलंदाजी प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ४६ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. तर त्यापुढील २ चेंडूंवरही त्याने सलग २ चौकार मारले.
पण पुढे १८व्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकुर आणि यष्टीमागे उभा असणाऱ्या धोनीने मिळून राहुलला झेलबाद केले. विशेष म्हणजे, हा धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील यष्टीमागील १००वा झेल होता. २००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या धोनीने जॅक्स कॅलिसला पहिल्यांदा यष्टीमागे झेलबाद केले होते.
धोनीपूर्वी आयपीएलमध्ये यष्टीमागील १०० झेल पूर्ण करण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने केला होता. असे असले तरी, धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत १९५ सामने खेळत १३९ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईच्या धडाकेबाज विजयानंतर सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया
हैदराबादला धूळ चारत मुंबईचा ३८ धावांनी विजय; घेतली अव्वल क्रमांकावर उडी
व्याजासकट वसूल..! थेट कर्णधाराला तंबूत धाडलं; कदाचित मॅच पण इथेच जिंकली??
ट्रेंडिंग लेख-
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?