आयपीएल १०१०च्या उद्घाटन सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने दणक्यात हंगामाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर सलग ३ सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. पण रविवारी (४ ऑक्टोबर) चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबला १० विकेट्सने चितपट करत दमदार पुनरागमन केले.
मात्र सलामीला फलंदाजीसाठी आलेले शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस चेन्नईच्या या शानदार विजयाचे हिरो ठरले. अर्थात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आपल्या फलंदाजीच्या बळावर संघाला आापर्यंत एकही सामना जिंकून देऊ शकला. याच कारणामुळे चाहत्यांनी धोनीवर टिका करायला सुरुवात केली आहे. पण भारतीय क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने धोनीच्या टिकाकारांना कडे प्रत्युत्तर दिले आहे.
ओझा म्हणाला की, “हा एक सांघिक खेळ आहे, त्यामुळे कोणता एक खेळाडू संघासाठी सगळ्याच गोष्टी नाही करु शकत. तो (धोनी) संघाचे नेतृत्त्व, सलग मोठ्या आकडी धावा या गोष्टी सातत्याने नाही करु शकत. संघातील इतर खेळाडूंनाही त्यांचे योगदान द्यावे लागते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंनी लवकर विकेट्स गमावल्या नसत्या किंवा संघाच्या अपेक्षांप्रमाणे केदार जाधवने फलंदाजी केली असती, तर मला नाही वाटत की, धोनीला राशिद खानच्या षटकात एवढी बचावात्मक फलंदाजी करावी लागली असती. कारण तो त्यावेळी आपली विकेट गमावू शकत नव्हता.”
“जर त्यावेळी धोनी बाद झाला असता, तर सर्वांना रविंद्र जडेजाचे अर्धशतक पाहायला मिळाले नसते. तो त्या सामन्यात ५० धावा करु शकला, कारण त्याच्या दूसऱ्या बाजूला धोनी उभा होता. धोनीने प्रत्येक पातळीवर त्याचे उत्कृष्ट देताना दिसला आहे. यावर्षी त्याच्या नेतृत्त्वावर आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच त्याच्या फिटनेसविषयीही खूप थट्टा केली जात आहे,” असे पुढे बोलताना ओझाने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
दोस्ती असावी तर अशी! स्वत:ला मिळालेला पुरस्कार दिला मित्राला
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ ३ मोठे विक्रम असतील विराट कोहलीच्या निशाण्यावर
वेळ निघून जात आहे! गौतम गंभीरचा राजस्थानच्या ‘या’ दोन खेळाडूंना इशारा
ट्रेंडिंग लेख-
दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा