ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने आयपीएल २०२० भारताबाहेर होत असल्यामुळे निराशा व्यक्त केली आहे. भारतात कोव्हिड-१९ची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात न आल्यामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईत योजण्यात आला आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. Steve Smith Disappointed Due To IPl Is Shifted In Dubai,
“खेळाडूंना युएईमधील परिस्थितीशी ताळमेळ बनवावा लागेल. यासाठी त्यांना जास्त अडचण येणार नाही. कारण, प्रत्येकजण क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.” राजस्थान रॉयल्सच्या इनसाइड स्टोरी या डॉक्यूमेंट्रीच्या विशेष प्रीमियरमध्ये व्हिडिओ कॉनफन्सद्वारे पत्रकारांशी बोलताना स्मिथने या गोष्टींचा उल्लेख केला.
स्मिथने आपल्या राजस्थान संघातील मुख्य अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सविषयी बोलताना म्हटले की, “प्रत्येक कठीण परिस्थितीत स्टोक्स यशस्वी होण्याची इच्छा बाळगतो. त्यामुळे प्रत्येक कर्णधार त्याला आपल्या संघात सामाविष्ट करु इच्छितो. परंतु स्मिथची अपेक्षा आहे की, अद्याप स्टोक्सने इंग्लंडकडून उत्कृष्ट प्रदर्शन करु नये. तर, संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० साठी वाचवून ठेवावे.”
पुढे बोलताना स्मिथ म्हणाला की, “स्टोक्सबरोबर माझे राजस्थान संघातील सहकारी जोफ्रा आर्चर आणि जॉस बटलर यांनीही सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त चांगले प्रदर्शन करु नये. त्यांनी जास्त धावाही करु नयेत आणि जास्त विकेट्सही घेऊ नयेत. त्यांनी आपले प्रदर्शन आयपीएलसाठी बाकी ठेवावे.”
“मी स्टोक्सची प्रगती होताना पाहिली आहे. त्याचे विश्वचषकातील प्रदर्शन दमदार राहिले आहे. काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या कसोटी मालिकेतही त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. फलंदाजीबरोबरच त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्टोक्स हा असा खेळाडू आहे, ज्याला क्रिकेटच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात दमदार प्रदर्शन करण्याची चुरस आहे,” असे स्टोक्सविषयी बोलताना स्मिथ म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-बकरी ईदच्या निमित्ताने पीसीबीने पाठवले पाकिस्तान संघाला ‘स्पेशल गिफ्ट’, पहा व्हिडिओ
-‘या’ ज्येष्ठ भाजप नेत्याच्या मुलाला सीके खन्ना ग्रुपचे समर्थन, बनणार दिल्ली क्रिकेटचा अध्यक्ष
ट्रेंडिंग लेख-
-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही