गेल्या काही वर्षांमध्ये मैदानावर खेळाडूंच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. रविवारी कोलकात्याच्या विवेकानंद पार्क मैदानावर देबब्रत पॉल या 21 वर्षीय क्रिकेटपटूचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाला.
रविवारी दुपारी एकच्या दरम्यान विवेकानंद पार्क मैदानावर सराव करताना त्याच्या अंगावर विज पडून त्याचा मृत्यु झाला.
अष्टपैलू खेळाडू असलेल्या देबब्रतने गेल्या महिन्यातच कोलकाता क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला होत.देबब्रत हूगळी जिल्ह्यातील सेरमपूर गावचा रहिवासी होता.
यावेळी पत्रकारांशी बोलतान या आकादमीचे संचालक अब्दुल मसूद म्हणाले, आम्ही नुकतेच वार्म-अप करून सरावाला सुरवात केली होती पण अचानक विजा चमकू लागल्या आम्हाला काही कळायच्या आतचं देबब्रत जिथे उभा होता तीथे वीज पडली. त्याचबरोबर तो खाली पडला. आम्ही त्याला तातडीने रामकृष्ण मिशनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.”
यापूर्वीही कोलकात्यातील जाधवपूर विश्वविद्यालयात क्रिकेट सामन्या दरम्यान अंकित केसरी या क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यु झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
–एकाच दिवशी ३ दुबळ्या संघांनी ३ दिग्गज संघांना चारली पराभवाची धूळ
–ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाचे बेंगलोर शहरात आगमन
–भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता
-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत डेव्हिड वार्नरकडे मोठी जबाबदारी