क्रिकेट खेळण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते तंदुरुस्ती ज्याला इंग्रजी भाषेत फिटनेस म्हटले जाते. आज क्रिकेटच्या प्रत्येक स्तरावर क्रिकेटपटूच्या फिटनेसला खूप महत्त्व दिले जाते. जर, एखादा देशांतर्गत क्रिकेट खेळणारा खेळाडू शरीराने फिट असेल आणि त्याचे प्रदर्शनही उत्तम असेल. तर, त्याची भारतीय संघात येण्याची शक्यता खूप जास्त असते.
सध्याचा भारतीय संघ पाहायचा झाला तर, संघातील जवळपास अनेक खेळाडू फिट आहेत. यामध्ये संघाच्या ट्रेनर्सचाही मोठा वाटा असण्याची शक्यता आहे. एव्हाना खेळाडू स्वत:च त्यांच्या फिटनेसबाबत खूप गंभीर असल्याचे दिसून येते.
भारतीय संघातील विराट कोहलीपासून ते हार्दिक पंड्या, उमेश यादव, जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंनाही फिट समजले जाते. परंतु, खेळताना जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होतो. तेव्हा पुनरगामनापुर्वी त्याला यो-यो टेस्ट (फिटनेस टेस्ट) द्यावी लागते. सॉफ्टवेअरद्वारे घेतल्या जाणाऱ्या या यो-यो टेस्टमध्ये खेळाडू २० मीटरच्या अंतरापर्यंत धावत असतो. त्याला ३वेळा बीप असा आवाज आल्यानंतर धावण्यास सुरुवात करावी लागते. त्यानुसार सॉफ्टवेअरवरुन त्या खेळाडूचा स्कोर समजतो. भारतात यो-यो टेस्टचा स्कोर हा कमीत कमी १६.१ इतका असावा लागतो.
या लेखात आपण, यो-यो टेस्टमध्ये टॉप करणाऱ्या काही भारतीय खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत
3 Highest Yo-Yo Test Scorer Indian Players
मयंक डागर
मयंक डागर हा खेळाडू भारतीय संघाकडून कधीच खेळला नाही, त्यामुळे तो फार क्वचित जणांना माहित असणार. परंतु, हा खेळाडू यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू आहे. त्याने १९.३ या स्कोरसह यो-यो टेस्टमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
मयंक हा फिरकीपटू आहे. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून आयपीएल खेळले आहे. तसेच, तो देशांत्रगत क्रिकेटमधील हिमाचल प्रदेश संघाचा फिरकी गोलंदाज आहे. शिवाय तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचाही भाग होता.
मनीष पांडे
मनीष पांडेने त्याच्या खेळाने आणि फिटनेसने वेगळीच छाप पाडली आहे. त्याच्या फिटनेसमुळे तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत असतो. त्याचा यो-यो टेस्टमधील स्कोर हा १९.२ इतका आहे. मनीषने भारताकडून वनडे आणि टी२० क्रिकेट खेळले आहे. तसेच तो आयपीएलमधील दमदार फलंदाज समजला जातो.
विराट कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू समजले जाते. त्याने त्याच्या फिटनेससाठी मांसाहारी अन्नाचा देखील त्याग केला. परंतु, या फिट खेळाडूचा यो-यो टेस्टमधील स्कोर हा १९.१ आहे.
ट्रेंडिंग लेख-
‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाची शक्यता आहे खूप कमी
टी२०मध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज; एक नाव आहे भारतीय
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात…