कोणत्याही क्रिकेटपटूचे हेच स्वप्न असते की आपल्या देशासाठी दीर्घकाळासाठी खेळावे. यातील काही क्रिकेटपटू हे स्वप्न पूर्ण करु शकतात तर काही क्रिकेटरपटू फार काळ नाही खेळू शकत. जर आपण सचिन तेंडुलकरचे उदाहरण घेतले तर त्याने चोविस वर्षे भारतासाठी खेळली. त्यावेळी त्याने अनेक मोठे विक्रमही केले.
सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू क्वचितच जागतिक क्रिकेटमध्ये येतात. एवढे वर्षे खेळूनही त्यांच्या उत्साहात व आवडीत किंचितही फरक पडत नाही. काही खेळाडू असेही आहेत, जे दीर्घकाळासाठी खेळत नाहीत आणि लवकरच त्यांच्या निवृत्तीची घोषणा करतात. त्यांच्या या निर्णयामागे बरीच कारणे असतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेच खेळाडू आहेत जे लवकरच निवृत्त झाले, परंतु त्यांच्या चाहत्यांना त्यांनी अधिक काळ खेळावे अशी इच्छा होती. या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अपेक्षेपेक्षा लवकर निवृत्ती घेतली.
१. सुरेश रैना –
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचे नाव येते. सुरेश रैना हा भारतासाठी एक जबरदस्त खेळाडू राहीला आहे. विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तो एक फिनिशर म्हणून खेळायचा. त्याने बऱ्याचदा आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला आहे. रैना हा केवळ जबरदस्त फलंदाज नसून एक उत्तम क्षेत्ररक्षक सुद्धा होता.
सुरेश रैनाने त्याचा अंतिम सामना हा २०१८ मध्ये भारतासाठी खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले होत. टी-20 विश्वचषक स्पर्धेतून त्याला संघात पुनरागमन करायचे होते परंतु 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याच दिवशी भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीही क्रिकेटमधून निवृत्त झाला. सुरेश रैना हा अवघ्या ३४ वर्षाचा आहे. त्याच्या फिटनेसकडे बघून अनेकांनी रैनाने निवृत्तीची घाई केली, असे मत मांडले.
२. एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीमुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले. धोनीचे चाहते हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत आणि त्याच्या या निर्णयामुळे सर्वजण निराश झाले. 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीनंतर एमएस धोनीने एकही सामना खेळला नव्हता. त्याने प्रत्येक मालिकासाठी स्वत:ला अनुपलब्ध केले आणि त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जागतिक क्रिकेटमध्ये एमएस धोनीची एक वेगळी व मोठी प्रतिमा आहे. तसेच त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते आहेत. हे चाहते धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाने निराश झाले होते.
३. शेन वॉटसन –
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर शेन वॉटसन याने बरेच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत होता. मात्र आयपीएल २०२० नंतर त्याने क्रिकेटच्या सर्व फॅारमटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या 13 व्या सत्रात शेन वॉटसनने फलंदाजीत कोणतीही कमाल दाखवली नाही. म्हणूनच त्याने
निवृत्तीची घोषणा केली. पण वॅाटसनच्या चाहत्यांचा मते त्याने निवृत्तीसाठी घाई केली.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्या झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ
तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहे, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया