वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बरोबर चार वर्षांपूर्वी 23 जानेवारी 2016 ला सिडनी येथे भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पदार्पणानंतर त्याने सातत्याने भारतीय संघाकडून चांगली कामगिरी केली आणि आता केवळ चार वर्षात तो भारताचा प्रमुख गोलंदाज बनला आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर आत्तापर्यंत भारताकडून 12 कसोटी, 61 वनडे आणि 45 टी20 सामने खेळले आहेत.
Young pacer Jaspreet Bumrah gets his ODI cap. All set to make his Debut at the SCG #AUSvIND pic.twitter.com/M9HmZiw8S1
— BCCI (@BCCI) January 23, 2016
जसप्रीत बुमराहबद्दल माहित नसणाऱ्या गोष्टी –
– बुमराहने आत्तापर्यंत खेळलेले सर्व 12 कसोटी सामने परदेशात खेळले आहेत. त्याला आत्तापर्यंत भारतात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे, टी20 आणि कसोटी या तीन्ही प्रकारातील बुमराहचे पदार्पण परदेशात झाले आहे. सिडनी येथ वनडे पदार्पण केल्यानंतर तीनच दिवसात 26 जानेवारीला बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्धच ऍडलेड येथे टी20 पदार्पण केले. तर कसोटी पदार्पण त्याने जानेवारी 2018ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे केले.
– ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा बुमराहची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट आहे. बुमराहने वनडे पदार्पणाचा सामना खेळताना स्मिथला 28 धावांवर बाद केले होते. तसेच बुमराहने टी20 पदार्पणानंतर पहिली विकेट डेव्हिड वॉर्नरची घेतली. तर कसोटी पदार्पणात पहिली विकेट एबी डिविलियर्सची घेतली आहे.
– बुमराह हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. बुमराहने ऑगस्ट 2019ला किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळताना हॅट्रिक घेतली होती. याआधी हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटीत हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता.
– बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने 45 सामन्यात 53 विकेट्स घेतल्या आहेत.
– मागील दोन वर्षे बुमराह गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवून आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता होणार कट?
वाचा👉https://t.co/DTLetLkJNs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
न्यूझीलंड विरुद्ध बदला घेणार का? कर्णधार कोहलीने दिले 'हे' उत्तर
वाचा👉https://t.co/jm9RKKzbuS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020