पुणे । स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे ६व्या कॉर्पोरेट सुपर ९ टी-२० क्रिकेट स्पर्धेत कॉर्पोरेट क्षेत्रातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले असून यामध्ये टेक महिंद्रा, फुजित्सु, एसक्यूएस-इंडिया, एम्प्टोरीज, अॅमडॉक्स, अर्न्स्ट अँड यंग, सेल २ वर्ल्ड, सिनेक्रॉन, महानगर बँक, टीआरडीडीसी, सारस्वत बँक, कॅलसॉफ्ट, इन्फोव्हिजन लॅब्स, अॅटॉस्, एएसपी ओ१ मीडिया, राईजस्मार्ट, प्रिया पॉलिमर्स,वेंकीज,एचडीएफसी बँक, आयप्लेस, नॉर-ब्रेम्से, नेटसर्फ, बार्कलेज, एबीआयएल, युनियन बँक, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, गालाघर,बीएमसी सॉफ्टवेअर, कुंदन स्पेसेस, सेलपॉईंट टेक्नॉलॉजी, गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
तसेच, साखळी फेरीत प्रत्येक संघ ३ सामन खेळणार असून प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ३५हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व २०हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय मालिकावीर खेळाडूला करंडक व १०हजार रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.