गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेला 20 लाख या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले आहे.
त्यामुळे तो 2020 आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असलेला मुंबईचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी दिल्लीच्या संघात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. तर शॉ देखील मागील काही मोसमांपासून दिल्लीच्या फ्रँचायझीकडून खेळत आहे. तसेच रहाणेला 2020 आयपीएलसाठी दिल्लीने राजस्थान रॉयल्सकडून प्लेअर ट्रेडिंगनुसार संघात सामील करुन घेतले आहे.
त्यामुळे आता मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारे अय्यर, शॉ, रहाणे आणि देशपांडे हे चार खेळाडू आयपीएल 2020मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने 2020 आयपीएलसाठी गुरुवारी पार पडलेल्या लिलावात एकूण 8 खेळाडू खरेदी केले आहेत. यातील शिमरॉन हेटमायरसाठी त्यांनी सर्वाधिक 7 कोटी 75 लाख एवढी किंमत मोजली आहे. त्याच्यापाठोपाठ त्यांनी मार्कस स्टॉयनिससाठी 4 कोटी 80 लाखांची बोली लावली आहे.
आयपीएल 2020 साठी असा दिल्ली कॅपिटल्सचा संघ –
लिलावाआधी संघात असलेले खेळाडू –
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अमित मिश्रा, अवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, अजिंक्य रहाणे.
लिलावात घेतलेले खेळाडू-
शिमरॉन हेटमायर (7.75 कोटी), मार्कस स्टोईनिस (4.80 कोटी), अलेक्स कॅरी (2.4 कोटी), जेसन रॉय (1.5 कोटी), ख्रिस वॉक्स (1.5 कोटी), मोहित शर्मा (50 लाख), तुषार देशपांडे (20 लाख), ललित यादव (20 लाख)
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
हा भारतीय खेळाडू करणार किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व
वाचा👉https://t.co/rZPRQk71I5👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019