पुणे । सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अँमडॉक्स, इन्फोसिस, वेंकीज व टेक महिंद्रा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत आगेकुच केली.
पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात आवेश सय्यदच्या नाबाद 89 धावांच्या बळावर अँमडॉक्स संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 5 गडी राखून पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना बीएमसी सॉफ्टवेअर संघाने 19.4 षटकात सर्वबाद 133 धावा केल्या. यात श्रेयस करंदीकरने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 133 धावांचे लक्ष अँमडॉक्स संघाने केवळ 18.3 षटकात 5 बाद 134 धावांसह पुर्ण केले. आवेश सय्यद सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत रवी थापलीयालच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने एमफसीस संघाचा 106 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या.
यात संजय पुरोहीतने 64 धावा केल्या. 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एमफसीस संघ 18.5 षटकात सर्वबाद 66 धावात गारद झाला. रवी थापलीयालने 11 धावेत 5 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. रवी थापलीयाल सामनावीर ठरला.
अन्य लढतीत सुजित उबाळेच्या दमदार जलद 90 धावांच्या बळावर वेंकीज संघाने सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघाचा 47 धावांनी पराभव केला. तर साकेत देशपांडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा 98 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बीएमसी सॉफ्टवेअर- 19.4 षटकात सर्वबाद 133 धावा(श्रेयस करंदीकर 44(40), चिन्मय दुबे 22, अनिरूध्द पिंपळखरे 2-16, प्रविण खाल्खो 3-10) पराभूत वि अँमडॉक्स- 18.3 षटकात 5 बाद 134 धावा(आवेश सय्यद नाबाद 89(58), ब्रुमिक्स सुब्रमणियन 2-14) सामनावीर- आवेश सय्यद
अँमडॉक्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
इन्फोसिस- 20 षटकात 6 बाद 171 धावा(संजय पुरोहीत 64, महेबुब शेख 27, साईनाथ शिंदे 36, राजीव शेखर 2-23) वि.वि एमफसीस- 18.5 षटकात सर्वबाद 66 धावा(रत्नदिप लोंढे 27, रवी थापलीयाल 5-11, अश्लेष चौधरी 2-5, शारोन थॉमसन 2-14) सामनावीर- रवी थापलीयाल
इन्फोसिस संघाने 106 धावांनी सामना जिंकला.
वेंकीज- 20 षटकात 6 बाद 194 धावा(अदित्य कदम 38, सुजित उबाळे 90(52), ऑस्टिन लाझारुस नाबाद 37, पवन अनंद 2-33) वि.वि सनगार्ड/एफआयएस ग्लोबल- 20 षटकात 8 बाद 128 धावा(पवन अनंद 49, कमलेश रावलानी नीबीद 26, सागर बिर्डवाडे 3-24) सामनावीर- सुजित उबाळे
वेंकीज संघाने 47 धावांनी सामना जिंकला.
टेक महिंद्रा- 20 षटकात 7 बाद 159 धावा(साकेत देशपांडे 34, सचिन पिंपरीकर नाबाद 58, महेश तुपड 2-17) वि.वि दसॉल्ट सिस्टिम्स- 20 षटकात 7 बाद 61 धावा(अन्शुल गोस्वामी 21, स्वप्निल थोरात 3-11, साकेत देशपांडे 2-1) सामनावीर- साकेत देशपांडे
टेक महिंद्रा संघाने 98 धावांनी सामना जिंकला.