मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने या विजयासह आपल्या महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरवात केली.
भारताने प्रथमच इंग्लंमध्ये इंग्लंडवर टी२०मध्ये विजय मिळवला आहे.
या सामन्यात भारताने जे खास पराक्रम केले ते असे-
-काल कुलदीप यादवने २४ धावा देत ५ विकेट घेतल्या. टी२०मधील रिस्ट डावखुऱ्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
-भारताचा हा इंग्लंडमधील इंग्लंडविरुद्ध पहिलाच टी२० विजय
-विजयी संघाकडून शतकी खेळी करुनही सामनावीर पुरस्कार न मिळालेला केएल राहुल पहिलाच टी२० प्लेअर
-आजपर्यंत केवळ दोन वेळा आंतरराष्टीय टी२०मध्ये एकाच सामन्यात दोन शतके झाली आहेत. त्यात दोन्ही वेळा केएल राहुलने शतक केले आहे.
-भारताकडून टी२०मध्ये दोन शतके करणारा केएल राहुल दुसरा खेळाडू. यापुर्वी रोहित शर्माने २ शतके केली आहेत तर रैनाच्या नावावर एक शतक आहे.
-कमीतकमी टी२०मध्ये १० डाव खेळलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुलची सरासरी सर्वाधिक. राहुलने १७ सामन्यात ५५.९२च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत.
-भारताचा हा सलग ७वा टी२० विजय. भारताने तब्बल तीन वेळा सलग ७ विजय मिळवले आहेत. असे करणारा टी२०मधील जगातील एकमेव संघ
-दक्षिण आफ्रिकेनंतर एकाच सामन्यात शतक आणि ५ विकेट घेण्याची कामगिरी करणारा भारत हा दुसराच देश
-इंग्लंडमध्ये टी२० मध्ये शतक करणारा केएल राहुल हा अॅराॅन फिंचनंतरचा दुसराच खेळाडू
-भारताने गेल्या १५ टी२० सामन्यात केवळ दोन पराभव पाहिले आहेत तर तब्बल १३ विजय मिळवले आहेत.
-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये वेगवान २००० धावा करणारा पहिला खेळाडू. त्याने ६० सामन्यात४९.०७च्या सरासरीने २०१२ धावा केल्या आहेत. यापुर्वी त्यानेच वेगवान १००० धावा करण्याचा विक्रम केला होता.
-डिसेंबर २०१६नंतर केएल राहुलने प्रथमच शतकी खेळी केली. मधल्या काळात त्याने ३० सामन्यात ३५ डावात फलंदाजी करताना १४ अर्धशतके केली.
-टी२०मध्ये २००० धावा करणारा विराट कोहली हा चौथा खेळाडू ठरला. यापुर्वी मार्टिन गप्टील, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि शोएब मलिकने हा कारनामा केला आहे.
-गेल्या तीन टी२० सामन्यात कुलदीप यादवने तब्बल १२ विकेट्स घेतल्या आहेत.
-भारताकडून टी२०मध्ये ५ विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारनंतर तिसरा गोलंदाज
-इंग्लंडमध्ये टी२०मध्ये ५ विकेट्स घेणारा कुलदीप यादव दुसरा गोलंदाज. यापुर्वी उमर गुलने हा पराक्रम केला आहे.
-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा यष्टीचीत करण्याचा पराक्रम आता धोनीच्या नावावार. त्याने ९१ सामन्यात ३३ खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. यापुर्वी हा पराक्रम कामरान अकमलच्या नावावर होता. त्याने टी२०मध्ये ३२ खेळाडूंना यष्टीचीत केले होते.
-सलग दोन चेंडूवर दोन फलंदाजांना यष्टीचीत करणारा कुलदीप यादव टी२०मधील पहिलाच खेळाडू
-सलग तीन टी२० सामन्यात ३ विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा युझवेंद्र चहल नंतरचा दुसराच भारतीय गोलंदाज
-इंग्लंडकडून टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बटलर तिसऱ्या स्थानी
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने…
-अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
-सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!