आयपीएल २०२० च्या विजेतेपदाचा मान मुंबई इंडियन्स संघाला मिळाला. या विजेतेपदाबरोबरच या संघाने पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकण्याचा इतिहास रचला. या सामन्याबरोबरच हा आयपीएल हंगामही संपला. या आयपीएल हंगामात अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. अनेक खेळाडूंनी विविध विक्रम केले. त्यातील ५ विक्रमांचा आपण आढावा घेऊ.
१. रोहित, धोनीचे सामन्यांचे द्विशतक
या आयपीएल हंगामात एमएस धोनी आणि रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळला. धोनीने सर्वात आधी हा कारनामा केला. त्यानंतर रोहितने अंतिम सामना खेळताना हा कारनामा केला. आयपीएल २०२० चा सामना रोहितचा आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना ठरला. तर एमएस धोनीने एकूण २०४ आयपीएल सामने खेळले.
२. केएल राहुल सलग ३ हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव भारतीय खेळाडू –
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने यंदाच्या आयपीएल हंगामात १४ सामन्यात ६७० धावा केल्या. त्यामुळे तो सगल ३ आयपीएल हंगामात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने २०१८ च्या हंगामात ६५९ धावा केल्या होत्या. तर २०१९ च्या हंगामात ५९३ धावा केल्या होत्या.
३. ख्रिस गेलचे हजार षटकर –
किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने या आयपीएल हंगामात टी२० कारकिर्दीतील १००० वा षटकार मारला. याबरोबरच तो टी२० क्रिकेटमध्ये १००० षटकार मारणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला.
४. डेविड वॉर्नरच्या ५००० धावा –
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधाक डेविड वॉर्नरने यंदाच्या आयपीएल हंगामात खेळताना आयपीएल कारकिर्दीतील ५००० धावांचा टप्पा पार केला. तो आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. तर एकूण पाचवा खेळाडू ठरला. त्याच्याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवनने हा कारनामा केला. वॉर्नरने १४२ सामन्यात ५२५४ धावा केल्या आहेत.
५. जडेजाची अष्टपैलू कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने या आयपीएल हंगामात खेळताना आयपीएल कारकिर्दीत २००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. याबरोबरच तो आयपीएलमध्ये २००० धावा करणारा आणि १०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने २१५९ धावा आणि ११४ विकेट्स आयपीएलमध्ये घेतल्या आहेत.