पुणे | ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने ट्रिनिटी निमंत्रित क्रिकेट करंडक 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
10 मार्च पासून के.जे इन्स्टिटयूट मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे.
ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार आहे. दोन दिवसीय प्रत्येकी 90 षटकांचे सामने होणार आहेत.
स्पर्धेत एच. के ईगल्स, एच.के बेसिक्स, युनियन क्रिकेट क्लब, फल्लाह क्रिकेट अकादमी, सत्यम व्हेकेशन्स,, लेजेंड्स क्रिकेट क्लब हे सहा संघ झुंजणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात येणार आहे.