भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांनी अनेकदा भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही दिग्गज फलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अनेकदा फ्लॉप होऊनही त्यांना भारतीय संघात स्थान दिले गेले. परंतु त्यांना संधीचा लाभ घेता आला नाही. त्यांची निराशाजनक कामगिरी पाहता त्यांना आगामी मालिकेतून संघाबाहेर केले जाऊ शकते. दरम्यान संघाबाहेर होण्यापूर्वी संघात स्थान टिकवून ठेवण्याची एक मोठी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना फॉर्ममध्ये परतण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दोघेही रणजी ट्रॉफी (Ranji trophy) स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा येत्या १० फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. एलिट ग्रुपचे सामने हे १६ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. तर प्लेट ग्रुपचे सामने १० फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे श्रीलंका संघाविरुद्ध होणारी कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी या दोघांना स्वतःला सिद्ध करण्याची कमीत कमी दोन वेळेस संधी मिळू शकते.
या दोघांनी आप आपल्या संघांसोबत सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेत दोघेही मोठी खेळी करून फॉर्ममध्ये परतण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. अहमदाबादमध्ये सौराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात दोघेही एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येऊ शकतात. मुंबई संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “तो तयार झाला आहे. आम्ही अनेकदा भेटलो आहे, तो सध्या मुंबई संघासोबत सराव करतोय. तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्हाला भविष्याची चिंता करायची आवश्यकता नाही, आमच्यासमोर आता रणजी ट्रॉफी स्पर्धा आहे. दोघांना एका मोठ्या खेळीची आवश्यकता आहे. मला तर वाटते की, हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकता. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही शतक झळकावणार. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील आशा व्यक्त केली आहे की, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावा करतील.”
अजिंक्य रहाणे मुंबई संघासोबत सराव करण्यात व्यस्त आहे. तर चेतेश्वर पुजारा देखील सौराष्ट्र संघासोबत सराव करत आहे. फिटनेस ट्रेनिंगसह पुजाराने ९० मिनिट नेटमध्ये सराव केला.
महत्वाच्या बातम्या :
शिखरचा १८ वर्षांपूर्वीचा ‘गब्बर’ विश्वविक्रम आजही अबाधित, वाचा काय होता ‘तो’ पराक्रम
एकाच सामन्यात शतकही अन् ५ विकेट्सही! पाकिस्तानच्या कर्णधाराचा विश्वचषकात कहर कारनामा