इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेला संघ गुजरात टायटन्स संघाने हंगामातील चौथा सामना सोमवारी (११ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात त्यांना हैदराबादकडून ८ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद राहत अर्धशतक झळकावले. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. हा गुजरात संघाचा हंगामातील पहिलाच पराभव होता. त्यांनी हंगामातील पहिले ३ सामने सलग जिंकले होते. विशेष म्हणजे, आता पंड्यामुळे एका चाहत्याला त्याची नोकरी गमवावी लागणार आहे.
झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या होत्या. यावेळी हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ४२ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकार ठोकत नाबाद ५० धावा केल्या. यादरम्यान स्टेडिअममध्ये एका चाहत्याच्या हातात वेगळ्याच प्रकारचे पोस्टर दिसले. यानंतर तो चाहता सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
नेमका किस्सा काय आहे?
मैदानावर उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हार्दिक पंड्यासमोर एक आव्हान ठेवले होते. तसेच, त्याने एक मोठे वचनही दिले होते. त्या चाहत्याने पोस्टरवर लिहिले होते की, “जर हार्दिकने ५० धावा केल्या, तर मी नोकरी सोडेल.” हैरान करणारी बाब अशी की, पंड्याने गुजरात संघाच्या डावादरम्यान शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आपले अर्धशतक झळकावले. आता त्यामुळे तो चाहता जोरदार ट्रोल होत आहे.
Relax guys Hardik anchored so that he can give this guy a lesson😌 pic.twitter.com/olF32znDIt
— Shivani (@meme_ki_diwani) April 11, 2022
Hardik is such a legend. He got someone out while he was batting pic.twitter.com/Bd7UVCnTZU
— Sagar (@sagarcasm) April 11, 2022
#SRHvsGT
hardik pandya 😂😂 pic.twitter.com/AJeMufkb52— x (@_Mementos) April 11, 2022
He is not the first guy whose job got affected by Hardik Pandya, KL Rahul still remains first. pic.twitter.com/HBnrsXJzLu
— Satyam Singh (@MyFreakyTweets) April 11, 2022
पंड्याचे आयपीएल इतिहासातील सर्वात सावकाश अर्धशतक
पंड्याचे हे आयपीएल इतिहासातील सर्वात सावकाश अर्धशतक होते. पंड्या हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ४२ धावा खेळला. यापूर्वी पंड्याने आयपीएल २०१८मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना ४१ चेंडूत अर्धशतक केले होते.
आयपीएल २०२२मध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याचे शानदार पुनरागमन
आयपीएल २०२२पूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिलीझ केले होते. मात्र, आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेली आयपीएल फ्रँचायझी गुजरातने त्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले. मागील काही महिन्यांपासून आपल्या फिटनेसवर काम करत होता. पंड्याने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पहिल्या ४ सामन्यात त्याने आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्वाने कमाल दाखवली आहे. फलंदाजी करताना त्याने १४१ धावा झळकावल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्सही घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याच्या नेतृत्वात गुजरात संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: अभिनव मनोहरवर हैदराबादच्या खेळाडूंची कृपा, चक्क ३ कॅच सोडल्यानंतर फलंदाजालाही फुटलं हसू
सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर
‘ती’ अविस्मरणीय खेळी, जेव्हा ब्रायन लाराने विरोधकांची पिसे काढत चोपल्या होत्या बिनबाद ४०० धावा