क्रिकेटजगतात असे अनेक विक्रम बनले आहेत ज्यांना मोडणे खूप कठीण आहे. पण काही विक्रम असेही आहेत ज्यांना मोडण्याचा विचारही कोण करू शकत नाही. असाच एक विक्रम नोंदवला होता ऍडम गिलख्रिस्टने. Adam Gilchrist only cricketer who played 3 world cups and won all the 3 world cups.
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज गिलख्रिस्टने त्याच्या कारकिर्दीत सलग ३ विश्वचषक खेळले आहेत आणि तिन्ही वेळेला विश्वचषक जिंकण्यात त्याला यश आले आहे. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या एतिहासात तो एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या नावावर तीन पैकी सलग तीन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम आहे. कारण रिकी पाॅटींग व ग्लेन मॅकॅग्रा हे जरी ३ विश्वचषक जिंकले असले तरी रिकी पाॅटींग ५ तर ग्रेल मॅकॅग्रा ४ विश्वचषक खेळला होता.
तिन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ५०पेक्षा जास्त धावा करणारा गिलख्रिस्ट जगातील एकमेव फलंदाजही आहे.
१९९६मध्ये आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात करणारा गिलख्रिस्ट १९९९ला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विश्वचषक संघाचा भाग होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत चषकावर आपले नाव कोरले होते. या वेळी अंतिम सामन्यात गिलख्रिस्टने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या.
पुढे, २००३सालच्या विश्वचषकातही गिलख्रिस्टने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ४८ चेंडूत ५७ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात १२५ धावांनी भारताला पराभूत करत विजय मिळवला होता. तर, २००७साली गिलख्रिस्टने शेवटचे विश्वचषक खेळले आणि या विश्वचषकताही ऑस्ट्रेलियाने श्रीलंकाला पराभूत करत चषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी श्रीलंकाविरुद्धच्या अंतिम सामन्यात गिलख्रिस्टने १०४ चेंडूत १४९ धावा केल्या होत्या.
याचा अर्थ असा होतो की, गिलख्रिस्टने तिन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, २००७सालचा विश्वचषक जिंकत ऑस्ट्रेलियाने सलग ३ वनडे विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता.
गिलख्रिस्ट हे वनडेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तर होते. पण, यासह त्यांनी वनडेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्सही घेतल्या होत्या. ते वनडेतील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वनडेत २८७ सामने खेळत गिलख्रिस्ट यांनी यष्टीमागे एकूण ४७२ विकेट्स घेतल्या आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांच्या यादीत अव्वल क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा याचे नाव आहे. त्याने एकूण ४०४ वनडे सामन्यात यष्टीमागे ४८२ विकेट्स घेतल्या आहेत.
तर, तिसऱ्या क्रमांकावर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी विराजमान आहे. त्यान त्याच्या वनडे कारकिर्दीत ३५० सामने खेळत यष्टीमागेल ४४४ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
एकाच शहरात विराट व रोहित वेगळे सामने खेळत असतील तर कैफ ‘या’ खेळाडूचा सामना पाहणार
वसीम अक्रमचा बुमराहला सल्ला, ‘असे’ क्रिकेट खेळू नकोस…
ना विराट; ना रोहित, जोफ्रा आर्चरला भिती वाटते या भारतीय फलंदाजाची