अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे आयपीएल 2020 खेळण्यासाठी अपात्र ठरला आहे. कारण तो अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता परदेशी लीगमध्ये खेळला असल्याने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचे नवे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी तांबे आयपीएल 2020 खेळण्यास अपात्र असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. तांबेने अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता दुबई आणि शारजातील टी 10 लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील किंवा त्यांनी आयपीएलपासून दूर रहावे आणि इतर देशांच्या लीगमध्ये खेळावे.
काही महिन्यांपूर्वी जगभरातील विविध लीग खेळता येण्यासाठी युवराज सिंगनेही बीसीसीआच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
48 वर्षीय तांबेला डिसेंबर 2019मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने(केकेआर) 20 लाखांच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले होते.
तांबेला जेव्हा केकेआरने संघात घेतले होते तेव्हा तो आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलेला सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता.
तांबेने याआधी आयपीएलमध्ये एकूण 33 सामने खेळले असून त्यात त्याने 30.46 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला 2013मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती.
3 वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर 2016 मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर 2017 मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने 10 लाखात संघात सामील करुन घेतले. पण त्याला या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
मुंबई वनडेत केएल राहुल की शिखर धवन, कोण करणार संघात स्थान कायम?
वाचा👉https://t.co/ityR1urWWw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @klrahul11 @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
शस्त्रक्रियेनंतर विराटने हार्दिक पंड्याला केला होता 'हा' मेसेज
वाचा👉https://t.co/feR6OvXieO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @hardikpandya7 @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020